Home नाशिक वनसगांवला उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान शाखेत निशिगंधा शिरसाठ तर कला शाखेत राहूल...

वनसगांवला उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान शाखेत निशिगंधा शिरसाठ तर कला शाखेत राहूल अस्वले प्रथम

124
0

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0010.jpg

वनसगांवला उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान शाखेत निशिगंधा शिरसाठ तर कला शाखेत राहूल अस्वले प्रथम

 दैनिक युवा मराठा 
निफाड रामभाऊ आवारे

वनसगांव तालुका निफाड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा सन २०२२-२३ वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला.विज्ञान शाखेचा निकाल शेकडा ९४.११ % तर कला शाखेचा निकाल शेकडा ८८.०९% असा घवघवीत लागला.कनिष्ठ महाविद्यालयाचे या निकालाबद्दल परीसरातून कौतुक होत आहे.विज्ञान शाखेतून कु.निशिगंधा महेंद्र शिरसाठ (८०.१७%) प्रथम, कु.समीक्षा अरूण केदारे व कु.ज्योती शांताराम निंबारे(६८.१७) द्वितीय तर कु.संस्कृती ज्ञानेश्वर शिंदे (६७%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेचा एकुण निकाल ९४.११% लागला असून एकुण ३४ विद्यार्थी परीक्षेस‌ प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून राहुल शरद अस्वले (६७.६७%) प्रथम,कु.पुजा दशरथ घाडगे (६७.३०%) द्वितीय तर विष्णू दिनकर कडाळे (६४.८३%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.कला‌ शाखेचा एकुण निकाल ८८.०९% लागला असून ४२ विद्यार्थी परीक्षेस‌ प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ‌आहेत.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य मा.डाॅ. सुजित गुंजाळ, वनसगांव स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राणूजी कापडी, शिवाजी नाना शिंदे, अशोकराव डुंबरे यांचेसह वनसगाव स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व‌ सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,वनसगांव,सारोळे,थेटाळे, ब्राह्मणगाव आदी गावचे सरपंच,उपसरपंच व सर्व‌ सदस्य पत्रकार संघ , पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, माता पालक संघ सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे, पर्यवेक्षक किसन दरेकर यांचेसह पालक व‌ सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनिषा मेनगर, विजय पांगुळ,गणेश कोलते, योगिता जाधव,सोमनाथ जाधव, वैशाली रायते,सुनिता शिंदे ,अश्विनी पोकळे, अक्षय सोमवंशी‌‌ यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleसंपादकीय अग्रलेख… वेंदे साहेब,आपल्या राज्यात काय हे धंदे! बदनाम हुये तो क्या हुआ,काम तो हुआ!
Next articleऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here