Home सामाजिक ऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार 

ऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार 

56
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20230530-182304_Google.jpg

ऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार

नाती तीच खरी असतात,
जी एकमेकांवर रुसतात, रागावतात,
भांडतात पण……!
साथ कधीच सोडत नाहीत.
ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो की तो व्यक्ती आपल्याला एक फोन करेल एक मेसेज करेल .मोबाईल च्या रिंग कडे आपले कान आपले डोळे नजर ठेवून बसलेले असतात. मुळात तोच व्यक्ती दुसऱ्याशी सतत तास अन तास ऑनलाईन राहून बोलत असतो. दुसऱ्याशी बोलण्यासाठी वेळ काढत असतो पण आपल्याशी मात्र कारणे देऊन बहाणे सांगून तो व्यक्ती आपल्याशी बोलणे टाळत असतो .आपला तिरस्कार करत असतो अशावेळी समजून जायचं की त्या व्यक्तीला आता आपली गरज राहिलेली नाही. आपण त्या व्यक्तीला किती ही म्हणलो की माझ्याशी बोल तरी तो काही एक ऐकणार नाही .आणि सतत आपल्यावर रागावेल आपलीच चुकी काढून आपल्याशी भांडण करेल चिडचिड करेल. अशा वेळेस समजून जायचं की त्या व्यक्तीला आपली गरज राहिलेली नाही त्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लवकर बाहेर पडायचं असतं .कारण त्या व्यक्ती ने कधीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलेल नसत,मग अशा व्यक्ती पुढे किती ही डोकं आपटलं तरी दगडाच्या काळजाला त्याच काय…! वेदना मात्र आपल्याच होणार असतात. ज्याचा त्या व्यक्तीला काहीही फरक पडत नसतो आपण असलो काय आणि नसलो काय याच्याशी त्याला काही ही घेणं देणं नसतं. तो दुसऱ्यांशी मजेत बोलत असतो, संवाद साधत असतो आपण मात्र इकडे त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत असतो त्याची वाट पाहत असतो. म्हणून सत्य स्वीकारा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लवकर बाहेर पडा .स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका ज्याला आपली काहीही किंमत नाहीये त्याच्या आयुष्यात थांबून तरी काय फायदा ..!
ज्या व्यक्ती बरोबर आपण नातं जपतो त्या व्यक्तीला आपण खरोखरच महत्वाचे आहोत का ? हे अजमावणे पण तेवढेच गरजेचे असते …!
याचा कोणाच्या वैयक्तिक जीवनाशी काहीही संबंध नाही.

Previous articleवनसगांवला उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान शाखेत निशिगंधा शिरसाठ तर कला शाखेत राहूल अस्वले प्रथम
Next articleजयश्री बागुल व राहुल वन्से यांचा सत्कार ;पोलीस दलात झाली निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here