Home नाशिक जयश्री बागुल व राहुल वन्से यांचा सत्कार ;पोलीस दलात झाली निवड

जयश्री बागुल व राहुल वन्से यांचा सत्कार ;पोलीस दलात झाली निवड

147
0

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0029.jpg

जयश्री बागुल व राहुल वन्से यांचा सत्कार ;पोलीस दलात झाली निवड
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
दहिवड : येथील भुमिकन्या जयश्री संजय बागुल हिची मुंबई पोलीस म्हणून तर भुमिपूत्र राहुल भाऊसाहेब वन्से याची नासिक पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल या दोघांचा ग्रामविकास समितीतर्फे सत्कार करण्यात आला. राज्यात नुकतीच पोलीस भरती करण्यात आली. त्यात जयश्री बागुल व राहुल वन्से यांची अनुक्रमे मुंबई व नाशिक येथे पोलीस दलात निवड झाली. या दोघांच्या निवडीमुळे दहिवड गावात आनंदाचे वातावरण आहे.
बागुल व वन्से यांची पोलीस दलात निवड झाल्यामुळे त्यांचा ग्रामस्थ व ग्रामविकास समितीतर्फे सत्कार सोहळ्याचे मंगळवारी (दि.३०) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयश्री बागुल हिचा सत्कार माजी सरपंच डॉ. राजेंद्र ब्राम्हणकार, जेष्ठ नागरिक बळीराम भिला सोनवणे यांच्या हस्ते तर ग्रामविकास समिती मार्फत बक्षीस स्वरूपात रूपये ५०१ चा धनादेश समितीचे संचालक गौतम महिरे यांनी दिला.
राहुल यांचा सत्कार वडील भाऊसाहेब वन्से यांनी स्विकारला. ग्रामविकास समितीचे माजी संचालक जगन्नाथ सोनवणे, माजी सरपंच जिभाऊ सोनवणे यांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तर धनादेश उपसरपंच राजाराम ठाकरे, जेष्ठ नागरिक पुंजाराम गबा देवरे यांनी दिला.
त्याचप्रमाणे अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिलीप सोनवणे यांनीही दोघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रमेश सोनवणे, जिभाऊ निकम, रमेश बेलदार, प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, रामदास बागुल, दशरथ बस्ते, नारायण देवरे, नारायण सोनवणे, विकासो चेअरमन दिलीप सोनवणे आदिसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleऑनलाईन ओढ ऑफलाइन तिरस्कार 
Next articleपालघर जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबांना न्याय देऊन पूनर्वसन करण्यासाठी सटाण्यात उपोषण सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here