Home नाशिक श्रीक्षेत्र वडगाव पंगु येथील अखंड हरिनाम सप्ताहास  आज २८ पासून प्रारंभ

श्रीक्षेत्र वडगाव पंगु येथील अखंड हरिनाम सप्ताहास  आज २८ पासून प्रारंभ

78
0

Yuva maratha news

1000322012.jpg

श्रीक्षेत्र वडगाव पंगु येथील अखंड हरिनाम सप्ताहास  आज २८ पासून प्रारंभ

भागवताचार्य हभप गजानन महाराज सोनवणे शास्त्री आळंदी यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

ब्रह्मस्वरूप सद्‌गुरु लहरीनाथ महाराज, ह.भ.प.वै. नामदेव महाराज शिंगवे व वै.ह.भ.प.शाम महाराज शास्त्री, रायपुर यांच्या आशिर्वादाने वै.ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंगवे यांच्या सोज्वळ प्रेरणेने व अखिल भारतीय वारकरी संस्थान, वडगांव ह.भ.प.माधव महाराज खताळ, मठाधिपती, पुणतांबा व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाने श्री क्षेत्र विठ्ठल रुख्मिणी देवस्थान, वडगांव पंगु, ता. चांदवड, जि. नाशिक येथे रविवार २८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत समस्त ग्रामस्थ वडगांव पंगु आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित केला आहे तरी या परमार्थिक कार्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समस्त ग्रामस्थ, भजनी, महिला व तरुण मंडळ वडगांव पंगु, ता. चांदवड यांनी केले आहे.
कलश पूजन ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर विणा व ध्वज पुजन समस्त ग्रामस्थ, वारकरी, महिला व तरुण मंडळ, स्वाध्याय बंधु, जय मल्हार मंडळ व भाविक करतील ग्रंथ पुजन श्री तृष्टानंद महाराज रापली आश्रम व्यासपीठ चालक ह.भ.पआप्पा महाराज जाधव

दैनंदिन कार्यक्रम ५.५ ते ६.३० वा. काकडा, स.७ ते ११ वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दू.२ ते ४ वा. पारायण सायं. ४ ते ५ वा प्रवचन सायं. ६ ते वा. सामुदायिक हरिपाठ रा.९ ते ११ वा. किर्तन.

किर्तनाची रुपरेषा पुढिलप्रमाणे—
रविवार २८ एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. वैष्णव महाराज जाधव, आळंदी यांचे कीर्तन, किर्तन सेवा : कै. रामभाऊ केदु चव्हाण स्मरणार्थ, यश एंटरप्राइजेस, दुपारचे संत भोजन-भाऊसाहेब केदु चव्हाण, सायं अन्नदाते-. विलास भगवान संसारे, सोमवार २९ एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. अशोक महाराज सत्रे, वैजापुर यांचे कीर्तन, किर्तन सेवा: कै.अशोक भिकाजी पगारे स्मरणार्थ, दुपारचे अन्नदाते- वाळुबा लहानु गोजरे भाऊसाहेब लहानु गोजरे, माणिक गणपत झाल्टे सायंकाळचे अन्नदाते -सुर्यकांत गेणुजी चव्हाण, मंगळवार ३० एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. दिपक महाराज ठोकळे, तांदुळवाडी फाटा यांचे कीर्तन, किर्तन सेवा: कै. गिताबाई सखाराम सातभाई स्मरणार्थ, दुपारचे अन्नदाते -राजेंद्र नागुजी गोजरे, सायंकाळचे अन्नदाते -.डॉ.पगारे वडगांव पंगु, बुधवार १ मे रोजी रात्री ह.भ.प.माऊली महाराज पांचाळ, ठाणे यांचे कीर्तन, किर्तन सेवा: कै. त्र्यंबक कारभारी गोजरे स्मरणार्थ, दुपारचे अन्नदाते -राजेंद्र जगन्नाथ गोजरे, संध्याकाळचे अन्नदाते -कर्णल एकनाथ गुजर, गुरुवार २ मे रोजी रात्री
ह.भ.प. कृष्णा महाराज जाधव, आळंदी यांचे कीर्तन, किर्तन सेवा सागर विठ्ठल पवार यांचेतर्फे दुपारचे अन्नदाते -पोपट शंकर चव्हाण, संध्याकाळचे अनिल वाल्मिक झाल्टे, शुक्रवार ३ मे रोजी रात्री ह.भ.प. शाम महाराज ठोंबरे, पुरणगांव यांचे कीर्तन, किर्तन सेवा: कै. आवडाबाई वाल्मिक गोजरे स्मरणार्थ, दुपारचे अन्नदाते -माणिक धर्मा चव्हाण, संध्याकाळचे अन्नदाते -लक्ष्मीमाता मंदिर परिसर (गल्ली), वडगांव, शनिवार ४ मे ह.भ.प.ऋषिकेश महाराज कुयटे, धानोरे यांचे कीर्तन, किर्तन सेवा: कै. सुनिल वाल्मीक झाल्टे यांचे स्मरणार्थ, दुपारचे अन्नदाते -.ह भ.प.परसराम सुकदेव चव्हाण, संध्याकाळचे अन्नदाते आप्पासाहेब पांडूरंग जाधव.रविवार ५ मे रोजी सकाळी ९ ते ११ अयोध्या मंदिर येथे पहिल्या कीर्तनाचा मान धर्मांनुरागी विश्व हिंदू परिषद सहाय्यक भागवताचार्य ह भ प गजानन महाराज सोनवणे शास्त्री आळंदी यांचे काल्याचे किर्तन, किर्तन दातृत्व – कै सौ राधाबाई धर्मा चव्हाण यांचे स्मरणार्थ किर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सप्ताहात गायनाचार्य चंदु महाराज बोळीज,हभप अंबादास महाराज बोराडे विसापुर, मृदंगाचार्य विठ्ठल महाराज सोनवणे अनकवाडे व पेटीमास्तर गणेश वाघ मनमाड यांची साथ लाभणार आहे.

Previous article23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये
Next articleसंत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारक-यांचा श्वास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here