Home माझं गाव माझं गा-हाणं दुर्दैवी ; रिक्षाचालकावर काळाचा घाला ; रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

दुर्दैवी ; रिक्षाचालकावर काळाचा घाला ; रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

469
0

राजेंद्र पाटील राऊत

दुर्दैवी ; रिक्षाचालकावर काळाचा घाला ; रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकच्या भगुर येथे वास्तव्यास असलेल्या महेंद्र रामभाऊ कापसे हे
रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.भाऊबीजेसाठी शनिवारी (दि.६)रोजी आपल्या स्वतःच्या रिक्षेने पत्नीला माहेरी देवळा तालुक्यातील वाखारी येथे पोहचवायला येत असताना रस्त्यातच अचानक त्यांच्या छातीत दुःखु लागल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबवली मात्र काही कळायच्या आतच काळाने घात केला अन् ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रामेश्वर ता.देवळा शिवारातील करला धरणाजवळ घडली.पत्नीने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आर्तहाक देत मदतीची याचना केली यावेळी काही नागरीकांनी तात्काळ उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. ऐन दिवाळीत कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत देवळा पोलिस ठाण्यात एकनाथ उत्तम शिंदे रा.वाखारी ता.देवळा यांनी फिर्याद दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यासंदर्भात पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी करीत आहेत.

Previous articleयंदाची दिवाळी व्यवसायिकांना लाभदायी : आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय
Next articleपिक विमा परतवा आज पासून जमा होनार शेतकऱ्याच्या बँक खात्यात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here