Home नांदेड पिक विमा परतवा आज पासून जमा होनार शेतकऱ्याच्या बँक खात्यात.

पिक विमा परतवा आज पासून जमा होनार शेतकऱ्याच्या बँक खात्यात.

140
0

राजेंद्र पाटील राऊत

पिक विमा परतवा आज पासून जमा होनार शेतकऱ्याच्या बँक खात्यात.

मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा मिळण्यास विलंब झाला होता.परंतु आता सोमवारपासून (ता. आठ) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी होवून पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नदीकाठचा भाग तसेच सखल भागातील जमिनीमध्ये पाणी साचून पिके नष्ट झाली होती. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पिक विमा भरला होता. सुरूवातीला पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे नुकसानीचे प्रमाण अधिक होते.या मुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी चार लाखाच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल झाले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी वेळोवेळी कंपनी प्रतिनिधींशी समन्वय साधून शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजूरीसाठी पाठपूरावा केला होता. या मुळे राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला होता. जिल्ह्याला मंजूर झालेल्या विमा शेतकऱ्यांना त्वरित द्यावा असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही दिले होते. दरम्यान दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ४६१ कोटी रुपयांचा मंजूर विमा शेतकऱ्यांना मिळावा असे नियोजन होते.

विमा परतावा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता. परंतु देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी विमा जमा करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यानंतर बँकेला सुट्या आल्या. या मुळे सोमवारपासून (ता. आठ) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विमा परतावानुसार राज्य शासनाची ४५५ कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला विमा दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. हा विमा परतावा सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ही कार्यवाही दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल.

– डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड.

तालुकानिहाय मंजूर विमा

तालुका शेतकरी संख्या मंजूर परतावा

अर्धापूर २१७६३ १८.८१ कोटी

भोकर ३८०८१ २५.२५ कोटी

बिलोली ४७७६० ३२.७६ कोटी

देगलूर ६०३०३ ३८.०४ कोटी

धर्माबाद २३६५१ १९.४५ कोटी

हदगाव ६६०७४ ६१.६२ कोटी

हिमायतनगर १९४७७ १५.१२ कोटी

कंधार ९१०७९ ४१.७७ कोटी

किनवट ११०८३ ५.६९ कोटी

लोहा ९५३४७ ५३.०४ कोटी

माहूर १०२११ ९.५० कोटी

मुदखेड २१२८६ १४.३१ कोटी

मुखेड १०४६९७ ५०.०३ कोटी

नायगाव ६२०७१ ४०.९९ कोटी

नांदेड ३६७२० १९.५३ कोटी

उमरी २६१९९ १४.१९ कोटी

एकूण ७३५८११ ४६१.०९ कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here