Home नांदेड दिव्यांग वृध्द निराधार , गायरान पट्टेधारक भुमीहिन शेतमजूराचा आकोश मोर्चा आदिवासी नृत्य...

दिव्यांग वृध्द निराधार , गायरान पट्टेधारक भुमीहिन शेतमजूराचा आकोश मोर्चा आदिवासी नृत्य सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकला

238
0

राजेंद्र पाटील राऊत

दिव्यांग वृध्द निराधार , गायरान पट्टेधारक भुमीहिन शेतमजूराचा आकोश मोर्चा आदिवासी नृत्य सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकला

मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अखिल भारतीय किसान मजदूर सभा यांच्या संयुक्त पणे दिव्यांग वृध्द निराधार गायरान पट्टेधारक यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर केंद्रीय सचिव काँ अशोक घायाळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागेकरण्यासाठी
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन साठे चौक पासुन ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन करून श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे आक्रोश व आदिवासी नृत्य व घोषणेची संताप व्यक्त करीत धडकला.
मोर्चातील शिस्टमंडळ मा निवासी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा करून सतरा मागन्याचे निवेदण सादर केले.
दिव्यांग सं. संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल यांनी ज्या दिव्यांग वृध्द निराधार यांना जिवन जगण्यासाठी शासन दरमहा एक हजार रूपये दिले जाते त्यात दोन वेळा चहासाठी दुध तरी मिळते काय? ते कसे जगतील हे लोकप्रतिनिधी प्रशासन यांना लक्षात येत नसेल काय? लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांचे लाखो रूपये मिळताना त्यांचे कुटुंब चालत नाही म्हणून वेतन वाढ केली जाते तर दिनदुबळ्याना का वाढ होत नाही तेहि चार ते सहा महिने मिळत नसेल तर ते कसे जगत असतील त्यांचे दु:ख लोकप्रतिनिधी प्रशासनास कधी लक्षात येतील
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनो जागे होऊन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही म्हणून सर्वानी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले
काँ. अशोक घायाळे यांनी भुमीहिन गायरान पट्टैधारक यांना शासकीय जमीन दिल्यास त्यांना सुखासमाधानाने जगता येईल म्हणून शासनाने मसुरा जमीन, परंमपुक,गायरान,डोंगराळ,सिलिंग,वनजमीन,गावठाण जमीन,देैवस्थानची ई जमीन दिव्यांग, भूमिहीन यांना न देता हजारो एकर जमीन ट्ष्टला दिली जाते .व जे चाळिस वर्षापासून जमीन गायरान पट्टे ज्यानी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना ते पट्टे शासन प्रशासन कोणत्याही सुचना न देता ऊभ्या पिकाची नासाडी करून जमा करून घेत असल्यामुळे शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी आपण सर्वांनी संघटिपतपणे लढाईत शिलेदार झाल्याशिवाय न्याय मिळत नाही.
या मोर्चात ऊतम गायकवाड,वंसतराव कुडमते, पोटफोडे,सोपान नरहरे, मानेजी पाटिल,दादाराव बंङे ई कार्यकर्त्यांनी शासन प्रशासन यांच्या वर आपल्या भाषणात संताप व्यक्त केला.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर नवले, बालाजी होनपारखे,गजानन वंहिदे मैञे,किसन,विठ्ठलराव बेलकर ईत्यादी कार्यकर्त्यांचा सह्या आहेत.

Previous articleपिक विमा परतवा आज पासून जमा होनार शेतकऱ्याच्या बँक खात्यात.
Next articleएसटी कर्मचाऱ्यांचे आडमुठे धोरण, कोर्टाचा अवमान करू नका परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन …. एस टी कामगारांची भूमिकेकडे लक्ष…?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here