Home नाशिक खळबळजनक…. “मी माझ्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन चालली! पण… त्यांना सोडू नका...

खळबळजनक…. “मी माझ्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन चालली! पण… त्यांना सोडू नका दुर्दैवी महिलेची मरणाअगोदर पोलिसांना आर्त हाक!!

218

आशाताई बच्छाव

1000356685.jpg

खळबळजनक…. “मी माझ्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन चालली! पण… त्यांना सोडू नका दुर्दैवी महिलेची मरणाअगोदर पोलिसांना आर्त हाक!!
(तौफिक अतार/कैलास बाविस्कर)
नाशिक:- किती वेळा मला मारलं, छळलं अन् रस्त्यावर बसवलं.मला माझ्या मुली पासून कुणी दुर करु शकत नाही,मी चालली माझ्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन.आता कर तुझ्या कुटुंबाचं! असे उदीग्न संताप करीत अश्विनी निकुंभ या विवाहितेने आपल्या दोन्ही मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली आहे.त्यामुळे नाशिक शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, नाशिक शहरातील आडगाव नाका भागातील अश्विनी निकुंभ या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून हे कठोर पाऊल उचलले आहे.अश्विनी निकुंभ या सासरच्या जाचाला त्रस्त असलेल्या विवाहितेने अगोदर आपल्या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांची हत्या केली व त्यानंतर स्वतः इमारती वरुन उडी घेऊन आत्महत्या केली.अश्विनी निकुंभ या विवाहितेने या सगळ्या घटनेचा मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवून ठेवला .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ,घटनास्थळाचा पंचनामा केला व तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तर आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहलेले पत्र आम्ही जसेच्या तसे प्रसारीत करीत आहोत,मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आत्महत्या करतेय. याला कारण माझा नवरा स्वप्नील निकुंभ आहे.भविष्यकाळात होऊन गेलेल्या गोष्टीवरून स्वप्नील मला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.त्याच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुली आराध्या व अगस्थाला सोबत घेऊन आत्महत्या करत आहे.स्वप्नील त्याच्या कुटुंबामुळेच म्हणजे त्याचा भाऊ तेजस निकुंभ (शंभू) आणि त्याची बहीण मयुरी सोमवंशी हिच्याशी माझे भांडण झाल्यामुळे स्वप्नील मला अचानकपणे भविष्यकाळात झालेल्या गोष्टीवरून मला ब्लँकमेल करून त्रास देतोय, म्हणून मी माझ्या मुलींना सोबत घेऊन आत्महत्या करतेय.स्वप्नीलने माझ्या आईकडून सहा लाख रुपये घेतले आहेत , ते त्याने परत द्यावेत.आणि ज्या राक्षसामुळे मला आणि माझ्या मुलींना जीव गमवावा लागला म्हणजेच स्वप्नील व त्यांच्या कुटुंबातील कुणीही हात लावू नये, माझ्या व माझ्या मुलींचे अंत्यसंस्कार माझा भाऊ अथर्व व राजश्री कोटकर यांनी करावा.आम्ही तिघी या जगातून गेल्यावर हे पत्र गायब करण्याचा देखील प्रयत्न होईल,मात्र मोबाईल पण चेक करावा.आणि माझा व माझ्या मुलीचा जीव घेणा-या स्वप्नील,शंभू, ताऊ यांना शिक्षा मिळवी शेवटचा नमस्कार