Home नाशिक कराटे क्लब तर्फे मोफत कराटे शिबिराचे आयोजन

कराटे क्लब तर्फे मोफत कराटे शिबिराचे आयोजन

39
0

Yuva maratha news

1000319553.jpg

 

कराटे क्लब तर्फे मोफत कराटे शिबिराचे आयोजन

नाशिक, दिलीप चव्हाण ब्युरो चीफ:- सध्याच्या युगात आपली मुले ही मोबाईल, तंत्रज्ञानाच्या जाळात अडकलेली आहे आणि ह्यामुळे ते शारीरिक व मानसिक रोगांचे शिकार बनत चाललेले आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे ते मनमोकळेपणाने संवाद साधताना घाबरत आहे त्यांच्या मनात अनेक भितीनी घर निर्माण केले आहे. ह्याच पार्श्वभूमीवर ओकिनावा कराटे क्लब, नाशिक यांच्यातर्फे खास मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांचा शारीरिक व मानसिक व बौद्धिक दृष्ट्या विकास होऊन त्यांच्या जीवनात त्यांना यशगोती साध्य व्हावी हा ह्या प्रशिक्षण शिबिराचा मानस हेतू आहे. शिबिरामध्ये वय वर्षे ५ पुढील वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी प्रशिक्षण खुले आहे. प्रशिक्षणामध्ये योगा , विविध प्रकारचे व्यायाम, जिमनॅस्टिक , मुलांच्या उंचीची वाढ, मुलांचा सर्वांगीण विकास ह्या प्रशिक्षणाद्वारे करून घेण्यात येईल. हे प्रशिक्षण संपूर्णतः मोफत असून हे प्रशिक्षण दि. २ मे २०२४ पासून ३१ मे २०२४ पर्यंत सकाळी ७:०० ते ८:०० वाजेपर्यंत व संध्या ६:०० ते ७:०० ह्यावेळेत संपन्न होणार आहे. होणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संपर्क श्री. अरविंद भालेकर मो. ९५४५९७९५०१ किंवा ईमेल आयडी: arvindbhalekar1968@gmail.com . जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले जीवन आनंदमय व सुखमय करावे . विद्यार्थ्यांना आपल्या स्वसंरक्षणासाठी ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये नक्की सहभागी व्हावे ह्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक तसेच बौद्धिक विकासात उत्तुंगपणे वाढ होईल असे ३५-३७ वर्षे कराटे ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले प्रदीर्घ अनुभवी कराटे प्रशिक्षक श्री. अरविंद भालेकर हयांनी सांगितले.
शिबिराचे ठिकाण:- एकमुखी दत्त मंदिर, अंगणवाडी हॉल , रविवार कारंजा, नाशिक -१ .

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्याध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे यांची फेर निवड
Next articleईव्हीएम मध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदार उत्साहात मोठा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here