Home अमरावती ईव्हीएम मध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदार उत्साहात मोठा.

ईव्हीएम मध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदार उत्साहात मोठा.

51
0

Yuva maratha news

1000319555.jpg

ईव्हीएम मध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदार उत्साहात मोठा.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .

अमरावती.
अमरावती जिल्ह्याचा २० वा खासदार निवडीसाठी यावेळी शहरासह गावागावात उत्साह दिसून आला. काही केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला तर कुठे पाण्याची असुविधा झाली. तरी मतदारांमध्ये उत्स्फूर्त उत्साह दिसून आला. अंगाची काहीही करणारे उन्ह राहणार असल्याने निवडणूक विभागाने मंडपाची व्यवस्था केली असली तरी मतदारांच्या उत्साहाने एन वेळी अनेक केंद्रावर नियोजन कलमंडल्याचे दिसून आले. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात दोनच दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच गुरुवारी रात्री सर्वात्रिक पाऊस झाल्याने सकाळपासूनच वातावरण थंड हवा होता. त्यामुळे बहुतांश या नागरिकांची पावले मतदान केंद्राकडे वळली. शिवाय शहरासह ग्रामीण भागात तसेच मुस्लिम बहुल परिसरातील केंद्रावर एकच गर्दी झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर दिसून आले. मतदारांचा ओघ दुपारनंतरही कायम होता. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सायंकाळी ५ पर्यंत ५४.५० टक्के मतदान झाले. यामध्ये बडनेरा मतदारसंघात ५०.६१,तिवसा५२.७१, अमरावती ५४.६१, दर्यापूर ५३, मेळघाट ५५.२०,व अचलपूर विधानसभा मतदारसंघात ६१.३३ टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर हे अनेक मतदान केंद्रावर उन्हामध्ये रांगा होत्या. काही मतदारांनी सावलीचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.

Previous articleकराटे क्लब तर्फे मोफत कराटे शिबिराचे आयोजन
Next articleपावणे सात लाखाचा भ्रष्टाचार अभियंता सहकार गुन्हा दाखल. ग्रामीण पुरवठा योजनेत सरपंच, ग्रामसेवक आरोपी न्यायालयाचा आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here