Home Breaking News 🛑 मुंबई पोलिसांनवर बोट ठेवणाऱ्या….! अमृता फडणवीसांना : रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले...

🛑 मुंबई पोलिसांनवर बोट ठेवणाऱ्या….! अमृता फडणवीसांना : रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले 🛑

94
0

🛑 मुंबई पोलिसांनवर बोट ठेवणाऱ्या….! अमृता फडणवीसांना : रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार असा सामना रंगला आहे.

तपासावरून दोन्ही राज्यामध्ये वाद पेटलेला असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच बोट ठेवून वादात उडी घेतली. त्यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे ट्वीट केले होते. ‘सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही. इथं निष्पाप लोकांच्या बाबतीत माणुसकी दाखवली जात नाही

मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही’ असं ट्वीट करून अमृता फडणवीस यांनी नव्या वादाला तोंड फोडले.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारून काढले आहे.

तुम्ही हे असं कसे म्हणू शकता, जिथे मुंबई शहरात लाखो लोकांचे संसार चालतात. हे शहर लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास ताकद देते. एवढंच नाहीतर विना झेड सुरक्षा सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते’ असं म्हणत रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला.

‘कोरोनाच्या परिस्थितीतही मुंबई पोलीस हे आपल्या सर्वांची 24 तास सुरक्षा करत आहे’ असं म्हणत शहाणे यांनी अमृता यांना आठवण करून दिली.

तसंच, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्वीट करू नये, जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हाही असेच ट्वीट केले असता का?’ अशा शब्दांत रेणुका शहाणेंनी खरमरीत टीका केली.

‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये’, असं परखड मतही रेणुका शहाणेंनी व्यक्त केले.

तर दुसरीकडे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती.

वरुण सरदेसाई म्हणाले की, ‘तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन असतात आणि त्यांच्यावर असा नीच आरोप करता?’ अशा शब्दात ट्वीट केलं आहे….⭕

Previous article🛑 दादांना मुखमंत्री झालेले बाघायच आहे….! बहिणीची इच्छा 🛑
Next article🛑 मुसळधार पावसानंतरही….! मुंबईत पाणी टंचाई निर्माण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here