• Home
  • 🛑 दादांना मुखमंत्री झालेले बाघायच आहे….! बहिणीची इच्छा 🛑

🛑 दादांना मुखमंत्री झालेले बाघायच आहे….! बहिणीची इच्छा 🛑

🛑 दादांना मुखमंत्री झालेले बाघायच आहे….! बहिणीची इच्छा 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕सोमवारी देशभरामध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बघायचे आहे…

अशी इच्छा त्यांची बहिण डॉ. रजनी इंदुलकर यांनी केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.

सोमवारी रक्षाबंधननिमित्त अजित पवार यांच्या बहिण डॉ. रजनी इंदुलकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधानपदी बघायचे आहे. तसेच, अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी.’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

‘दादा तुम्ही सगळ्यांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही, तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामे केली आहेत.

सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात. कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चालले किंवा आपले दु:ख काय आहे, ते कधीतरी सांगा. पण, तुम्ही हे आतापर्यंत केले नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आला आहात.

तर हीच आमची इच्छा आहे की, आम्हा बहिणींना तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हाला संधी मिळाली तर बरे होईल.’ असेदेखील पुढे त्या म्हणाल्या….⭕

anews Banner

Leave A Comment