Home पालघर एम आई डी सी स्फोटाने हादरली –औद्योगिक सुरक्षा संचनालय आऊट ऑफ रेंज...

एम आई डी सी स्फोटाने हादरली –औद्योगिक सुरक्षा संचनालय आऊट ऑफ रेंज –जिल्हा मुख्यल्यात जागा उपलब्ध तरीही वसई येथेच कार्यालय

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0041.jpg

एम आई डी सी स्फोटाने हादरली
–औद्योगिक सुरक्षा संचनालय आऊट ऑफ रेंज
–जिल्हा मुख्यल्यात जागा उपलब्ध तरीही वसई येथेच कार्यालय
पालघर, (वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून नावलौकिक मिळालेलं औद्योगिक वसाहत असलेली तारापूर ओद्योगिक वसाहतीत प्रीमिअर इटर्मिडीएट प्लॉट नं.टी-५७ कंपनी मध्ये मध्यरात्री स्फोट होऊन नंतर आग लागली होती. या आगीवर तारापूर औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले आहे.स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही केमिकल च्या मिश्रणाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने हे स्फोट होऊन आग लागली आहे. असे सूत्रांकडून समजले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील असलेल्या कारखान्यात औद्योगिक सुरक्षा नियम धाब्यावर बसवून परवानगीच्या बिना काम चालू असल्याचे समोर आले आहे. एका मिश्रणाची परवानगी घेऊन दुसरे मिश्रणाचे काम करण्यात येते. ही बाब कित्येक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आलेली आहे. तसेच औद्योगिक सुरक्षा संचनालायचे कार्यालय औदयोगिक वसाहती पासून ५०-६० किलोमीटर अंतरावर असल्याने अधिकारी कारखान्याची असलेली सुरक्षा तपासणी ची जवाबदारी असलेले कार्यालय वसई येथे असल्याने आग किंवा तत्सम दुर्घटना झाल्यास अधिकारी पोहचण्यास २४ ते ४८ तास एवढा कालावधी लागत असतो. म्हणून हेच औदयोगिक सुरक्षा संचालनालय कार्यालय पालघर जिल्ह्या मुख्यालयात असणे गरजेचे आहे. ही मागणी कित्येक महिन्यापासून प्रशासनाकडे काही संघटना आणि राजकीय पक्ष करीत आहेत.
औद्योगिक संचनालायचे अधिकारी त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत.

Previous articleपालघर पोलिसांना यश ७ दरोड्यातील आरोपी जेरबंद.
Next articleपी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती द्वारा कृषी संजीवनी सप्ताह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here