Home पालघर जव्हार मध्ये,आदिवासी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जव्हार मध्ये,आदिवासी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0026.jpg

जव्हार मध्ये,आदिवासी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
—– आत्महत्या नसुन खून केल्याचा संशय.

मयत महिलेच्या नातेवाईकांचा आरोप

काजूच्या झाडाला नायलाँन दोरीने लटकले प्रेत,गुडघे दगडांवर टेकलेले.

पालघर,(वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क)
जव्हार तालुक्यात हनुमान पाँईट जवळील काजूच्या बागेत एका विवाहित महिलेचे गळफास घेतल्याच्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याने जव्हार शहरात एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी काजूच्या वाडी मालकाच्या हे पहाटे लक्षात आले.याची माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर घटनास्थळी धाव घेत जव्हार पोलिसांनी पंचनामा केला.अंगात लाल रंगाचा कुर्ता,काळी सलवार घातलेल्या महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर महिलेची आत्महत्या कि,महिलेचा खून याबाबत नागरिकांमध्ये,संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जव्हार शहरातील हनुमान पाँईट जवळील शासकीय विश्रामगृहाच्या मागील नवीन राजवाड्याच्या काजूच्या बागेतील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका विवाहित महिलेचे प्रेत आढळुन आल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन खळबळ माजली आहे. ह्या मयत महिलेचे नाव अर्चना अशोक खुताडे असुन तिचे वय अंदाजे २२ वर्ष आहे.ह्या महिलेचे माहेर बोरहट्टी असुन तिचा विवाह प्रेम प्रकरणातुन बोराळे येथील तरुणाशी झाला आहे.ते दोघे पालघर येथे कंपनीत कामाला जात होते.
मात्र नवरा-बायकोत एकमेकांच्या मोबाईलच्या चँटिंग वरुन दोघांत नेहमी भांडण व्हायची. काल मंगळवारी ४ जुलै २०२३ ला कोवळ्या भाजीचा सण असल्याने ते नवरा बायको जव्हारला आले होते. माञ मयत महिलेच्या पतीने तिच्या नातेवाईकांना सांगितले कि, तुमची मुलगी हरवली आहे.यानंतर मुलींच्या नातेवाईकांनी राञी १२.५३ च्या सुमारास सदर मयत महिला हरविली असल्याची तक्रार नोंद करावयास गेले असताना जव्हार पोलीसांनी त्यांच्या तक्रारीची दाद घेतली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज तिचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
काजूच्या झाडाला पोपटी रंगाच्या नायलाँन दोरीने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.मयत महिलेचे गुडघे दगडावर टेकले आहेत.मयत महिलेच्या मानेपासुन काजुच्या फांदी जवळील दोरीचे अंतर ४फूट ८ इंच आहे तर मानेपासुन ते जमिनी पर्यंत अंतर ४ फूटांचे आहे.अशा उल्लेख जव्हार पोलिसांनी पंचनाम्यात केला आहे.घटनास्थळी मयत महिलेची काळ्या रंगाची ओढणी,छञी,रेडमी मोबाईल व तिची ब्राऊन रंगाची बँग आढळुन आली आहे.सदर मयत महिलेचा मृतदेह जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मयताच्या नातेवाईकांनी हि आत्महत्या नसुन खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
ह्या गुन्ह्याचा अधिक तपास जव्हार पोलिस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे करीत आहेत.नुकताच त्यांनी १ जुलै २०२३ रोजी जव्हार पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे.जव्हार तालुक्यात त्यांच्या अखत्यारित घडलेला हा पहिलाच गुन्हा असुन प्रकरणातील गुन्हेगारांचा छडा त्यांच्या कडून कसा लावला जाईल.याकडे आता जव्हारच्या सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here