Home अमरावती एस टी महामंडळाचे शिवशाही गाड्यांचा खाजगी कंपनीचा करार संपला.

एस टी महामंडळाचे शिवशाही गाड्यांचा खाजगी कंपनीचा करार संपला.

107
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230706-093329_WhatsApp.jpg

एस टी महामंडळाचे शिवशाही गाड्यांचा खाजगी कंपनीचा करार संपला.
दैनिक आवाज
वृत्तसेवा.
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती एसटी महामंडळाला शिवशाही गाड्या पुरवणाऱ्या खाजगी कंपनीचा करार शुक्रवारी ३० जून रोजी संपुष्टात आला. त्यामुळे प्रवाशांना थंडगार प्रवास घडवणाऱ्या खाजगी शिवशाही गाड्या आता रस्त्यात दिसणार नाही. फक्त सध्या अमरावती विभागाकडे असलेल्या महामंडळाच्या मालकीच्या ४५ शिवशाही गाड्यांचा सेवा देणार आहेत. महामंडळासोबत करार न वाढल्याने खाजगी शिवशाही गाड्या ंना ब्रेक लागला. तोंड देण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित शिवशाही गाड्यांची संकल्पना एसटी महामंडळाने अमलात आणली पासून राज्याभरात शिवशाहीची दौड सुरू झाली होती. थोड्याफार जादा पैशात थंडगार व आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला अमरावती विभागांनी चार खाजगी शिवशाही गाड्या महामंडळाच्या ताब्यात होत्या मात्र या गाड्या कोरोनापूर्वीच विभागातील दृष्टीच्या ताब्यांमधून कमी झाल्या होत्या. अशातच आता खाजगी शिवशाहीचा करार संपुष्टात आल्याने आता केवळ महामंडळाच्या ४५ शिवशाही बस प्रवासी सेवेत राहणार आहे अशातच या नव्या हिरकणी बसेसची मात्र प्रतीक्षा आहे. अमरावती विभागात ५ खाजगी शिवशाही बस होत्या. करारही संपला आहे. त्यामुळे आज घडीला विभागात महामंडळाच्या४५ शिवशाही बस प्रवासी वाहतूक करीत आहे असे विभागीय वाहतूक अधिकारी अभय बिउरे यांनी सांगितले आहे या मार्गावर शिवशाही अमरावती विभागात सध्या महामंडळाच्या ४५ शिवशाही बस जिल्ह्यातील ८ आगरा (डेपो)मधून नागपूर, अकोला, दर्यापूर, परतवाडा, वरुड, अमरावती, यवतमाळ अशा विविध मार्गावर धावत होत्या त्या सर्व शिवशाही बसेस महामंडळाच्या मालकीचे आहेत त्यामुळे शिवशाही अमरावती विभागात सध्या महामंडळाच्या बसेस आहेत या सर्व शिवशाही बसेस महामंडळाच्या मालकीचे आहेत त्यामुळे महामंडळालाही शिवशाहीच्या तंदुरुस्ती वर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Previous articleसूरजागड वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल
Next articleजव्हार मध्ये,आदिवासी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here