Home मुंबई राज्यपाल कोश्यांरीचे मराठी माणसाबद्दल बेताल वक्तव्य सर्वत्र निषेध

राज्यपाल कोश्यांरीचे मराठी माणसाबद्दल बेताल वक्तव्य सर्वत्र निषेध

54
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220730-200732_Google.jpg

पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मराठी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. शनिवार, ३०/०७/२०२२, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी काढले त्यांनी असं सांगितले गुजराती आणि मारवाडी वगळले तर मुंबईकडे काय राहील अशा भाषेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी केले. राज्यपालांनी असे म्हटले मुंबईमध्ये गुजराती आणि मारवाडी नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानी कशी राहील. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांकडून घाणगाती टीका होऊ लागली. त्यामध्ये राज ठाकरेंनी असे सांगितले की इतिहास माहिती नसेल तर बोलू नका ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यामध्ये आंदोलन सुरू झाले .उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ येऊ नये असा सल्ला दिला. महाराष्ट्र मध्ये हिंदू मध्ये फूट पाडू नका अशा प्रकारचे वक्तव्य या ठिकाणी होऊ लागले. महाराष्ट्र व मुंबई हे मराठी माणसांच्या रक्तामुळे उभी आहे असेही सांगण्यात ते विसरले नाही. मराठी माणसांचे बलिदान व मराठी माणसांचं योगदान हे मुंबई व महाराष्ट्र यांच्यासाठी खूप मोलाचे आहे हे राज्याचे राज्यपाल यांनी विसरता कामा नये. मुंबईमध्ये सर्व जमीन ह्या मराठी माणसांच्या आहेत व त्यावर उभे राहिलेले उद्योगधंदे यामुळे उभारी घेऊ लागलेली ही आर्थिक राजधानी बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे असे सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही असे सांगितले. चौफेर टीका होत आहे असे लक्षात आल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्य चा विपर्यास केला जात आहे असे सांगितले. त्यानंतर आपण मराठी माणसांबद्दल काही वाईट बोललोच नाही असे म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्याबद्दल भगतसिंग कोश्यारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात यावी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यापुढे महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही असे सांगितले गेले.

Previous articleकांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
Next articleजिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here