Home नांदेड दोन्ही डोळ्यांने अंध तरीही निराधार मिळेना ! येवतीच्या जळबा कांबळे या वृद्ध...

दोन्ही डोळ्यांने अंध तरीही निराधार मिळेना ! येवतीच्या जळबा कांबळे या वृद्ध आंधळ्यावर उपासमारीची वेळ !

130
0

राजेंद्र पाटील राऊत

दोन्ही डोळ्यांने अंध तरीही निराधार मिळेना !

येवतीच्या जळबा कांबळे या वृद्ध आंधळ्यावर उपासमारीची वेळ !

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातल्या येवती येथील रहिवाशी जळबा हैबती कांबळे वय वर्षे ६५ हे दोन्ही डोळ्यांने अंध असूनही त्यांना शासनाची अद्याप निराधार २४ वर्षापासून मिळत नाही. त्याला दोन मुली पत्नी अशा चार व्यक्तीचे कुटुंब असुन सद्याला ह्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

पूर्वी त्यांना निराधार मिळत होती. सुरुवातीला सहा वेळेस निराधार आल्यानंतर अचानकच बंद झाली असून सध्याला २४ वर्षापासून या अंध व्यक्तीला निराधार मिळत नाही . त्यामुळे सध्याला या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी चालू असलेली निराधार कोणाच्या सांगण्यामुळे किंवा काय तुरटयामुळे बंद झाली हेच कळायला मार्ग नाही. हे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असतानासुद्धा यांना अद्याप तरी घरकुलाचा लाभ मिळाला नाही. एकीकडे येवती गावात दोन – दोन मजली इमारती घरातील कुटुंबात शासकीय नोकरी , व आठ एकर बागायती शेती असणाऱ्यांना सुद्धा निराधार व शासनाच्या घरकुल योजनेचा दोन- दोन वेळेस लाभ मिळालयाचे अनेक उदाहरणे पाहावयास मिळत आहेत . तर दुसरीकडे दोन्ही डोळ्यांनी अंध जुनेघर तेही पडके, शेती सुद्धा नाही अशा व्यक्तींना ना निराधार ना घरकुलाचा लाभ ‌. व्वारे गावचे पुढारी आणि प्रशासनातील अधिकारी ! यालाच म्हणतात आंधळे दळतात आणि कुत्रे पीठ खातात ! याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. येवती येथील दोनी डोळ्याने अंध असलेल्या जळबा हैबती कांबळे यांनी अनेक वेळा मुखेड तहसील येथे बंद पडलेली निराधार चालू करावे यासाठी विनंती अर्ज केला अनेक वेळा नवीन फार्म ही भरून दिला आहे. पण अद्याप तरी त्यांच्या अर्जाचा कसलाच विचार केला गेला नाही . आता तरी प्रशासनाने येवती येथील जळबा हैबती कांबळे या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीची त्वरित निराधार चालू करावे अशी मागणी येवती येथील काही सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here