Home परभणी भोगाव शिवारामध्ये एस टी चालकाने विहिरीत उडी टाकून संपवली जीवन यात्रा ST...

भोगाव शिवारामध्ये एस टी चालकाने विहिरीत उडी टाकून संपवली जीवन यात्रा ST संपाचा आणखी एक बळी? जिंतूर आगारातील प्रकार

308
0

राजेंद्र पाटील राऊत

भोगाव शिवारामध्ये एस टी चालकाने विहिरीत उडी टाकून संपवली जीवन यात्रा

ST संपाचा आणखी एक बळी? जिंतूर आगारातील प्रकार

जिंतूर ,(विष्णू डाखुरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-: सध्या राज्यभर सुरू
असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा
संप सुरू आहे. संपामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर यापूर्वीही राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता याच संपामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगगरातील बस चालकांनी आत्महत्या केल्याची समजते. जिंतूर आगारातील बसचालक मुजफ्फरखा जाफरखा पठाण याने भोगाव शिवारात विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. आज दि.१२ शनिवारी सकाळी
मुजफ्फरखा उर्फ मुज्जुचे
प्रेत विहिरीत आढळून
आले. गेल्या चार महिने दहा दिवसापासून एसटीचा संप सुरू असून संपामुळे मुजफ्फरखा कर्जबाजारी झाला होता. काल
दि.११ मार्च रोजी न्यायालयाची
सुनावणीसाठी तारीख होती.
न्यायालयात निर्णय लागेल याची तो वाट पाहत होता. पण गेल्या चार महिन्यापासून तारीख पे तारीख न्यायालयाकडून मिळत आहे. दि.११ मार्च रोजीही या प्रकरणी काहीही निर्णय झाला नाही. २२ मार्चची पुन्हा नवीन तारीख न्यायालयाने दिली. हे ऐकल्यावर मुजफ्फरखा निराश झाला. न्यायालयाचा निर्णय काय येईल याची उत्सुकता त्याला होती. न्यायालयाची तारीख पुन्हा वाढल्याचे दि.११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कळताच जिंतूर बस स्थानकावरून मुजफ्फरखा निघाला व सायंकाळी भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या विहिरीवर पोहोचून विषारी द्रव्य प्राशन करून त्याने विहिरीत उडी मारली. आज शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान मुजफ्फरखा याचे प्रेत आढळून आले.

Previous articleदोन्ही डोळ्यांने अंध तरीही निराधार मिळेना ! येवतीच्या जळबा कांबळे या वृद्ध आंधळ्यावर उपासमारीची वेळ !
Next articleमनसे सैनिक जनार्धन उर्फ आबा सोनटक्के यांच्या मागणीला यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here