Home वाशिम मनसे सैनिक जनार्धन उर्फ आबा सोनटक्के यांच्या मागणीला यश

मनसे सैनिक जनार्धन उर्फ आबा सोनटक्के यांच्या मागणीला यश

134
0

राजेंद्र पाटील राऊत

मनसे सैनिक जनार्धन उर्फ आबा सोनटक्के यांच्या मागणीला यश

मंगरुळपीर,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम तालुकाध्यक्ष आबा सोनटक्के यांच्या मागणीला यश वाशिम ते पुसद रोड नी अनेक फाटे आहेत. दगड उमरा, फाळेगाव, जांभरून, आसरा पारडी, ब्रह्मा, पिपळगाव, शेलु. बु, अनसिंग फाटा,सापळी फाटा, उमराळा फाटा, शेलू.खु, अशा समोरच्या सर्व फाट्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी मनसे सैनिकांनी केलती. त्या रोड ची वाहतूक वाढल्याने त्या रोडवर गतिरोधक नसल्याने मागच्या तीन महिन्यांमध्ये अनेक एक्सीडेंट झाले काही जखमी तर काहींचा मृत्यू सुद्धा झाले. त्या कारणाने मनसे सैनिक आबा सोनटक्के यांनी दिनांक 23/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम अधीक्षक अभियंता साहेब यांना सदर वाशिम ते पुसद रोड वर जितके ही फाटे आहेत त्या फाट्यावर तात्काळ गतिरोधक बसवावे अशा मागणीचे निवेदन देऊन मागणी केली, अन्यथा सदर मागणीवर त्वरित कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिकांनी दिला होता. निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गतिरोधकाचे काम पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here