Home मुंबई नालंदा सेवा मंडळ मुंबईच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरा 

नालंदा सेवा मंडळ मुंबईच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरा 

36
0

आशाताई बच्छाव

1000307202.jpg

. नालंदा सेवा मंडळ मुंबईच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरा
. मुंबई,(प्रतिनिधी संदीप वाघमारे)
. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती महोत्सव सालाबादप्रमाणे विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या जल्लोषात, हर्षोल्लासात नालंदा सेवा मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.
आपल्या विभागात मागील ५४ वर्षांपासून विश्वरत्न – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. आणि त्या जयंतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ह्या वर्षी ही दि. ११ एप्रिल रोजी क्रांतीबा – जोतिबा फुले ह्यांच्या जयंतीदिनी सुरू करण्यात आलेल्या महोत्सवाची काल दि. १७ एप्रिल रोजी सांगता करण्यात आली. मागील ७ दिवस हा जयंती महोत्सव सुरू होता.
मित्रांनो, विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर जेव्हा नालंदा सेवा मंडळाच्या कार्यक्रमास भेट देऊन,मंडळाबद्दल गौरव उद्गार काढतात तेव्हा अभिमान वाटतो होय मीही नालंदा सेवा मंडळाचा भाग आहे.
मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो , कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते.१) द्रव्यबळ २) बुद्धीबळ आणि ३ ) मनुष्यबळ. ह्या तिन्हीही गोष्टींचा सुयोग, सुयोग्य पद्धतीने जोडला तर त्याला अपेक्षित यश प्राप्त होते.
त्यामुळेच मी प्रथमतः नालंदा सेवा मंडळाच्या कार्यकारिणीवर, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन मंडळाच्या विनंती वजा आर्थिक आवाहनाला साथ, प्रतिसाद देऊन सढळ हस्ते वर्गणी देऊन, वर्गणी अतिरिक्त धम्म ( आर्थिक ) दान देऊन तसेच भेटवस्तू स्वरुपात सहकार्य करणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायी आणि नालंदा सेवा मंडळाचे सहकारी यांचे आभार व्यक्त करतो.
तसेच, जयंतीच्या नियोजनात सुचना, मार्गदर्शन करणारे पाठबळ, सहकार्य , सहभाग देणारे मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, हितचिंतक , सभासद , महिला मंडळ त्यांचेही आभार व्यक्त करतो.
तसेच, कोणत्याही मान- सन्मानाची, पदांची अपेक्षा न ठेवता दिवस – रात्र , वेळी – अवेळी मंडळास सहकार्य करणारे, जयंतीचे नियोजित कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारचे योगदान देणारे, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जीवाच रान करणारे असंख्य सहकारी यांचेही विशेष आभार व्यक्त करतो.
मित्रांनो, बंधुंनो अशीच साथ, सोबत, संगत ,सहकार्य राहु द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे ,सर्वच प्रकारच्या योगदाना बद्दल आभार व्यक्त करुन येथेच थांबतो.

.

Previous articleगावागावात मतदान जनजागृती अभियान !
Next articleआ. गडाख धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व : ढोक महाराज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here