Home जळगाव रोहीणी येथे अडीच लाखांचा ऐवज लंपास

रोहीणी येथे अडीच लाखांचा ऐवज लंपास

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20231119_065344.jpg

रोहीणी येथे अडीच लाखांचा ऐवज लंपास
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दिवाळीनिमीत्त बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन घरातून 1 लाख 65 हजाराच्या रोकडसह सोने चांदीचे दागिणे असा सुमारे 2 लाख 35 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.14/11/23 रोजी दुपारी 12 ते 15/11/23 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील रोहीणी येथे घडली.
वाल्मीक वसंत दिघोळे (41) हे नांदगाव पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासह रोहीणी गावी राहतात. ते पत्नी व मुले यांच्यासह भाऊबिजेनिमीत्त चौका जि. छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते.
त्यामुळे रोहीणी येथील घर बंद होते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिघोळे यांच्या घराच्या कंपाऊंडचे कुलूप तोडून तसेच घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घराच्या तळमजल्यावरील कॉटखाली ठेवलेले 25 हजार रूपये तसेच वरच्या मजल्यावरील कपाटाचे लॉकर तोडून
त्यातील एकूण 1 लाख 65 हजार रूपये रोख, 30 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 30 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 3 हजार रूपये किंमतीचे ओम सोन्याचे पान, 3 हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, 3 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ओम पान लॉकेट, 1200 रूपये किंमतीच्या चांदीचे दोन जोड, 4 रूपये किंमतीच्या चांदीच्या अंगठ्या असा सुमारे 2 लाख 35 हजार 600 रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
याप्रकरणी वाल्मीक दिघोेळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवि कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here