Home Breaking News 😱 breaking news मराठा समाजाने सततच केलेल्या अन्यायामुळे लवकरच धर्मांतर करण्याचा राजेंद्र...

😱 breaking news मराठा समाजाने सततच केलेल्या अन्यायामुळे लवकरच धर्मांतर करण्याचा राजेंद्र पाटील राऊत यांचा खळबळजनक निर्णय!

411
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20231119_180825.jpg

😱 breaking news मराठा समाजाने सततच केलेल्या अन्यायामुळे लवकरच धर्मांतर करण्याचा राजेंद्र पाटील राऊत यांचा खळबळजनक निर्णय!
मालेगाव – आजवर आपण मराठा समाजाशी प्रमाणिक राहून विविध प्रकारच्या माध्यमातून समाजाची सेवा केली मात्र समाजातील काही नतद्रष्ट भामट्यांनी माझं नेहमीच खच्चीकरण करुन मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला लहानपणी माझे लग़्न एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा मोडून टाकण्याची नालायकी केली.तरी देखील मी आपल्या मराठा समाजाचा अभिमान बाळगून आजपर्यंत समाजातील विविध संघटना च्या माध्यमातून समाजकार्य करीत राहिलो.राष्ट्रीय मराठा पार्टी, भारतीय मराठा महासंघ त्याशिवाय युवा मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून मी सन २००३ सालापासून समाजाची सेवा करण्याबरोबरच समाजातील गरीब व गुणवंत बालकांसाठी शालेय साहित्य देणे, गोरगरिबांच्या मदतीसाठी ठामपणे उभे राहणे या पध्दतीने कार्य करीत असताना मी सन २०२१ पासून व-हाणे ता. मालेगाव जि नाशिक गावी असलेल्या माझ्या आश्रय आशा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्वखर्चाने सार्वजनिक पाणपोई हि ग़्रामपचायतीच्या गावठाण जागेवर चालवत आहे आणि ती जागा स्वतः तेथील तत्कालीन ग्रामसेविका सुवर्णा साळूंके यांनीच ताब्यात दिलेली आहे हे सर्वश्रुत असताना आणि ती जागा मला संस्थेला मिळूच नये म्हणून सध्या तेथे कार्यरत असलेले ग्रामपंचायतचे पदाधिकारी माझी अडवणूक करीत आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या जागा प्रश्नांवर माझा लढा हा तीन वर्षांपासून सुरू आहे आणि त्या जागेसाठी अनेकदा माझी कायद्यानुसार आंदोलने देखील झालेले आहेत.शिवाय त्या जागेचा वाद अजून मिटलेला नाही सदरची जागा आजही संस्थेच्या ताब्यात व वापरात असून, त्याच जागेच्या प्रश्नांवर मी ९ नोव्हेंबर २०२३ पासून मालेगाव पंचायत समिती समोर आमरण उपोषण सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात करणार होतो.मात्र दिनांक ३० आक्टोबर २०२३ रोजी मला व-हाणे गावचा ग्रामसेवक शिरसाठ याने येऊन उपोषण करू नये म्हणून एक पत्र देण्याचा प्रयत्न केला मात्र मी ते पत्र घेतले नाही त्यावर सदर ग्रामसेवकने बर… बर…बघून घेऊ असे बोलून तेथून काढता पाय घेतला आणि योगायोगाने मी माझ्या मोबाईलला स्टेटस ठेवलेले होते की उपोषणाचे प्रकार किती असतात. आणि त्याचा बहाणा करून दिनांक ३१ आक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माझेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला मी ठेवलेल्या मोबाइल वरील स्टेटस मध्ये आपल्या मराठा समाजाचा किंवा कुणाचा व्यक्तीगत उल्लेख नसतानाही सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण मुद्याचे भांडवल बनवत ग्रामसेवक शिरसाठच्या संगनमताने व-हाणेतील पाच गावगुंडांनी माझ्यावर मालेगाव पंचायत समिती परिसरात प्राणघातक हल्ला केला मला लाथा बुक्क्यांनी व चामडी बेल्टने अमानूष पुणे मारहाण केली माझा मोबाईल व दिनदर्शिका छपाई साठीचे पैसे काढून घेतले व मला एका चारचाकी वाहनातून पळवून नेत मालेगाव शहरातल्या क़ालेज रोडवरील मातोश्री हास्पिटल समोर पुन्हा बेदम मारहाण करून नंतर गाडीत डांबून दिवसाढवळ्या अपहरण करून “याला व-हाणेला घेऊन चला” याला झाडाला उलटे टांगून यांचा कायमचाच मुडदा पाडू अस बोलून हे व-हाणेतील गावगुंड मला गाडीतून पळवून नेत असताना मालेगाव शहरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील समाज बांधवांनी मला वाचवले त्यामुळे त्या दिवशी माझा जीव वाचला व समाज बांधवांमुळे त्या दिवशी घडणारे मोठे घातपाती कृत्ये टळलं पण व-हाणेतील या गावगुंडांनी ज्य माझ्या स्टेटसचा बाऊ करून समाजाला चिथावणी देऊन भडकविण्यासाठी जे कारस्थान रचले त्यामागील खरे तर या गावगुंडांची पोटदुखी वेगळी होती आणि मला समाजा विरोधी म्हणणा-या गावगुंडांना कदाचित हे सुध्दा माहिती नसेल की मराठा आरक्षणावर मनोज जरागे यांनी सुरू केलेल्या पहिल्या उपोषण आंदोलनला पाठींबा देणारा युवा मराठा महासंघ होता आणि नाशिक जिल्ह्यातून या आरक्षण प्रश्नांवर सगळ्यात अगोदर पाठींबा दर्शक उपोषण करणार असल्याची घोषणा करणारा जिल्हयातून एकमेव राजेंद्र पाटील राऊत होता.याची नोंद देखील मालेगावात छावणी पोलिस स्टेशनमध्ये आहे. त्याशिवाय अंतरावली सराटीत ज्या वेळेस मनोज जरागे यांचं अगदी सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यातील उपोषण आंदोलन चालू होते त्यावेळी युवा मराठा न्यूजचे विभागीय संपादक तथा युवा मराठा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष बालाजी पाटील नांदेड हे स्वतः संघटनेच्या आदेशानुसार उपोषणाचे गावात दोन दिवस थांबून होते मग असे असताना मी समाजाच्या विरोधात काय केले? की फक्त आपला डाव उगविण्यासाठी व बदला घेण्यासाठी व-हाणेतील या गावगुंडांना या पध्दतीने किळसवाणे व घाणेरडे राजकारण खेळण्याची गरज भासली.? शिवाय ग्रामसेवक शिरसाठच्या मदतीने या गावगुंडांनी व-हाणे गावात राहणाऱ्या गोरगरीब लोकांची दिशाभूल करून एक जातपंचायत बसविली आणि मी कुठेही दिसलो तर माझा सरळ सरळ खुन करायचा असा चंग या जातपंचायत मध्ये घेण्यात आला.म्हणजे केवळ आपले काळे कारनामे उघड केलेत म्हणून केवढे हे नीच कृत्य व कुटील कारस्थान! त्याशिवाय माझा डी एन ए तपासणी करण्याच्या वल्गना करणा- या गावगुंड भामट्याना कदाचित हे सुध्दा माहिती नसेल की माझ्या आईच्या मामाचे गाव हे व-हाणेच आहे तर माझ्या आजीचे माहेर हे देखील व-हाणेच आहे शहाण्णव कुळी मराठा जातीतून आलेली माझी आजी व आई यांचाही एकदा संपूर्ण इतिहास तपासा मगच कळेल आमचा सगळा तपशील…
युध्द नको, बुद्ध हवा!
मी सत्याच्या वाटेवर वाटचाल करीत असताना व वेळोवेळी समाजातील प्रश्नांवर लढत असताना माझ्यावर जीवघेणा हल्ला करून शिवाय स्वतः च्या मतलबासाठी समाजाची माझ्या बाबतीत दिशाभूल करणा-या या गावगुंडांच्या अत्याचाराला कंटाळून मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्यांसह लवकरच या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म स्विकारुन धर्मांतर करणार असल्याचा अंतिम निर्णय घेत आहे.मराठा आरक्षणच्या नावाखाली स्वतः ची पोळी भाजण्याचा हा गावगुंडांचा डाव व हलकट राजकारण भविष्यात समाजाला तारणारी नव्हे तर मारणारे ठरेल!
युवा मराठा जीवंतच राहणार!
मी जरी मराठा समाजाच्या या खोट्या कारस्थानाचा अन्यायाचा शिकार ठरुन धर्मांतर करीत असलो तरी युवा मराठा सुरूच ठेवण्यासाठी मी अत्यंत कष्ट घेऊन उभ्या केलेल्या युवा मराठा परिवारात अठरा पगड जाती धर्माची जिवाला जीव देणारी माणसं आहेत ते चालवतील यापुढे युवा मराठा ची चळवळ …….चौकट…… मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा कुणाला? गावागावात मुठभर भामटे गावगुंड आंदोलनाचा गैरफायदा घेऊन माझ्या सारख्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जबाबदार पत्रकारावर असा दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला समाजातील माणसाकडूनच होत असेल तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली या सुरु असलेल्या गैरप्रकारामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून मी माझे जीवन या गावगुंडांच्या दहशतीखाली जगत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून मी घराबाहेर पडलेलो नाही किंवा यंदाची दिवाळी सुध्दा केली नाही तसेच ३१ आक्टोबर रोजी माझ्यावर प्राणघातक हल्ला होऊन सुध्दा पोलिसांनी आज वीस दिवसांत गुन्हेगारावर कुठलीच कारवाई केली नाही. गुन्हात वापरलेले वाहन व माझा चोरुन नेलेला मोबाईल व दिनदर्शिका छपाईचे २५ हजार रुपये काढून नेले ते देखील पोलिसांनी आजपर्यत हस्तगत केलेले नाहीत त्याउलट स्वतः च्या मतलबासाठी समाजाची दिशाभूल करून माझ्या बाबतीत समाजात अपप्रचार करून माझे कुटुंब उद्ध्वस्त करणा-या गावगुंड भामट्याना प्रत्यक्ष परमेश्वर सुध्दा माफ करणार नाही केवळ वैयक्तिक स्वतः चा बदला घेऊन सुड उगविण्यासाठी जे षड्यंत्र रचले ते समाजाला कलंकित करणारे महाभयानक कृत्य म्हणूनच नोंद होईल एवढे मात्र निश्चित आणि म्हणूनच हे लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा धर्मांतर केलेले केव्हाही चांगलेच राहिलं म्हणून मी धर्मांतर करण्याचा अंतिम व शेवटचा निर्णय घेतला आहे.याबाबत सहयोगी सहकारी वर्गाशी बोलणे सुरू असून तसा अंतिम निर्णय लवकरच होईल- राजेंद्र पाटील राऊत
जय जिजाऊ! जय शिवराय!

Previous articleरोहीणी येथे अडीच लाखांचा ऐवज लंपास
Next articleतोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here