Home गडचिरोली तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले

तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले

73
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_175140.jpg

तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले

एट्टापल्ली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार)-: मागील अडीचशे दिवसांपासून सुरू असलेल्या तोडगट्टा आंदोलनाला शासनाने पोलीस बळाचा वापर करून आज चिरडून टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले. याबाबत माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा सदर आंदोलनस्थळी कारवाई नंतरही ठाण मांडून असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी निघाले असता गट्टा – जांभीया पोलीस मदत केंद्राजवळ त्यांना अडविण्यात आले.

याबाबत भाई रामदास जराते यांनी हेडरीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून सैनू गोटा हे या क्षेत्राचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिला गोटा या क्षेत्रातील माजी पंचायत समिती सदस्य असल्याने आम्हाला तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून आणि आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अडवू नये यासंबंधात चर्चा केली. मात्र संवेदनशीलतेचे कारण देवून अडवून ठेवण्यात आले.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार खदान कंपन्यांच्या इशाऱ्यावरुन पोलीस बळाचा वापर करून जनतेची मुस्कटदाबी करीत आहे, असा आरोप करुन तोडगट्टाचे खदान विरोधी आंदोलन दडपशाही केल्याने संपणार नसून संपूर्ण जिल्हाभरातील मंजूर आणि प्रस्तावित लोह खदानींच्या विरोधातील आंदोलन संविधानिक पध्दतीने व्यापक स्वरूपात सुरुच राहणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा यांनी दिला आहे.

Previous article😱 breaking news मराठा समाजाने सततच केलेल्या अन्यायामुळे लवकरच धर्मांतर करण्याचा राजेंद्र पाटील राऊत यांचा खळबळजनक निर्णय!
Next article_सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या_..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here