Home गडचिरोली रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला...

रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश

48
0

Yuva maratha news

1000322039.jpg

 

रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली असून मागील चार महिन्यांपासून या कामावरील मजूरांना मजूरी मिळाली नसल्याने होळीसारखा महत्वाचा सण अंधारात गेला आहे. त्यामुळे आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजूरांची मजूरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पाठपुराव्यामुळे जिल्हाभरातील रोजगार हमीच्या कामावरील मजूरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजूरी रक्कम मजूरांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १२ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सध्या लग्नसराई चे दिवस सुरू झालेले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कामावर राबून चार महिने झाल्यानंतरही मजूरीचा रुपयाही मजूरांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोजगार हमीच्या मजूरांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने याकडे लक्ष द्यावे. व दर आठवड्याला मजूरी देणे बंधनकारक असतांनाही चार महिण्यांचा विलंब झाल्याच्या कारणास्तव अतिरिक्त रक्कमेसह तातडीने जिल्ह्यातील सर्व मजूरांची थकीत मजूरी वाटप करावी. याबाबत प्रशासनाने दखल घेत १४ एप्रिल पर्यंतची संपूर्ण मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले आहे.

थकीत मजूरी मिळाल्याने जिल्हाभरातील रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आभार मानले आहेत.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन व जाफराबाद तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
Next articleअमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील सहा गावात मतदानाचा टक्का शून्य.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here