Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील सहा गावात मतदानाचा टक्का शून्य.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील सहा गावात मतदानाचा टक्का शून्य.

101
0

Yuva maratha news

1000322044.jpg

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील सहा गावात मतदानाचा टक्का शून्य.
_____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत मेळघाट मध्ये सहा गावाचा बहिष्कार कायम होता. लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान होत असताना मेळघाटात ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले. अमरावती जिल्ह्यातीलधारणी तालुक्यातील गावांनी मतदानात बहिष्कार टाकला होता. त्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने त्यांची मनधरणी सुद्धा केली. परंतु शुक्रवारी मतदानाच्या दिवशी एकही मतदान फिरकला नाही. धार्मिक तहसील अंतर्गत ग्रामपंचायत रंगुबेली हे गाव आहे. त्या अंतर्गत रंगुबेली, कुंड, धोकरा,खामदा,कीन्हिखेड,खोपमर ही ही गावे आहेत. या गावांमध्ये महावितरणाची वीज, पिण्यासाठी सुद्धा पाणी, पक्के रस्ते, आरोग्य सेवा केंद्र आदी सुविधा नाहीत. कुणी आजारी पडले तर त्याला खाजगी दवाखान्यात द्यावे लागते, त्यामुळे एकही वाहन जाऊ शकत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक तथा महसूल व ग्रामविकास यंत्रणे त्यांची मतदानासाठी मनधरणी केली होती. मात्र ते ठाम राहिले
दोन हजार मतदाते सहा गावांमध्ये सुमारे दोन हजार मतदार असून लोकसभा निवडणुकीत कोणीही मतदान करणार नाही, सर्वांनी एकमताने निर्णय घेतले ते ग्रामस्थांनी सांगितले, रंगू बेली गावात सौर दिवे बसविण्यात आले आहे. यानंतरही अडचणी येत आहेत. गावात विज उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील सहा गावांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यांना लोकशाहीचा हा हक्क बजविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणे मन धरणी केली होती. मतदान होण्याची अपेक्षा आहे असे धरणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here