Home अमरावती विभागीय आयुक्ताची एन्ट्री आण’ईर्विन शासकीय दवाखान्याची’बत्ती गुल. वीज नसल्याने होरंड्यात झोपल्याची पालकांची...

विभागीय आयुक्ताची एन्ट्री आण’ईर्विन शासकीय दवाखान्याची’बत्ती गुल. वीज नसल्याने होरंड्यात झोपल्याची पालकांची तक्रार.

50
0

आशाताई बच्छाव

1000356502.jpg

विभागीय आयुक्ताची एन्ट्री आण’ईर्विन शासकीय दवाखान्याची’बत्ती गुल. वीज नसल्याने होरंड्यात झोपल्याची पालकांची तक्रार.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बुधवारी विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी भेट दिली असता, त्याचवेळी रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ हा बाल रुग्ण विभाग असून येथील पालकांनी रात्रीपासून वीज नसल्याची तक्रार आहे त्याकडे केली रात्री वीज नसल्याने चिमुकल्या रुग्णांना रुग्णातील होरांडात घेऊन झोपावे लागले की खंत ही यावेळी रुग्णांनी बोलून दाखविली. त्यामुळे रुग्णालयातील विजेता लपंडावा कायमचा केव्हा थांबणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हे इतर शासकीय रुग्णालयाचे रेफर सेंटर असल्याने येथे रोज विविध आजारांनी ग्रासलेले शकलो हे उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच सध्या जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता, रुग्णालयात उष्माघात कक्षाची देखील स्थापना करण्यात आली त्या अनुषंगाने रुग्णालयातील औषधी तसेच रुग्णासाठी करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी विभागीय आयुक्त निधी पांन्डेय यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुरुवातीला जळीत वार्ड क्रमांक ४ मध्ये भेट दिली असता या ठिकाणी वीज नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी बाल रुग्ण विभाग असलेल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये भेट दिली यावेळी या ठिकाणी वीज नसल्याचे दिसून आले. यावेळी रात्रीपासून वार्डात वीज पुरवठा नसल्याचे तक्रार काही बाल रुग्णाच्या पालकांनी केली. रात्री १२ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्री साडेतीन वाजता सुरू झाला. परंतु त्यानंतर वारंवार विजेचा लपंडा सुरू राहिल्याने संपूर्ण रात्र ही रुग्ण बालकांना घेऊन रुग्णालयाच्या ओरंड्यात काढावी लागण्याचा रोष यावेळी पालकांनी व्यक्त केला. यावेळी विजेचा लोड वाढल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आयुक्तांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here