Home जालना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे मंगळवारी बदनापुर-भोकरदन दौऱ्यावर  मतदारांशी संवाद साधणार ...

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे मंगळवारी बदनापुर-भोकरदन दौऱ्यावर  मतदारांशी संवाद साधणार  प्रचार सभांचेही आयोजन

40
0

Yuva maratha news

1000322046.jpg

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण
काळे मंगळवारी बदनापुर-भोकरदन दौऱ्यावर
मतदारांशी संवाद साधणार  प्रचार सभांचेही आयोजन
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे हे दि. 30 एप्रिल रोजी भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून मतदारांची संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात  त्यांच्या प्रचार सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे सकाळी 7 वाजता भेट देवून डॉ. कल्याण काळे हे गावातील मतदारांशी संवाद साधणार आहे. त्यांनतर सकाळी 7.30 वाजता बाजार वाहेगाव, सकाळी 8 वाजता नाणेगाव, 8.30 वाजता रोषणगाव येथे भेट देवून मतदारांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता सोमठाणा येथे बाजार गेवराई, रोषणगाव, सेलगाव या जिल्हा परिषद गटांसह बदनापूर शहराची प्रचार सभा आयोजीत करण्यात आली आहे. दुपारी 1 वाजता बदनापूर शहरात विविध भागात भेटी देवून मतदारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 4 वाजता दाभाडी येथे दाभाडी जिल्हा परिषद गट, बावणेपांगरी जिल्हा परिषद गटाची प्रचार सभा आयोजीत करण्यात आली आहे. तर सायंकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे हसनाबाद, राजुर आणि तळेगाव या जिल्हा परिषद गटाची प्रचार सभा आयोजीत करण्यात आली आहे. या प्रचार दौऱ्यात उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या समवेत महाविकास (इंडिया) आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संबंधीत तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांची उपस्थिती राहणार असून महाविकास (इंडिया) आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावात व जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेस उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी प्रचार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील सहा गावात मतदानाचा टक्का शून्य.
Next articleसामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here