Home भंडारा सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’

सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’

51
0

आशाताई बच्छाव

1000322842.jpg

सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’

वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष

तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

 

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी)-येथील उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ व वैद्यकिय अधीक्षकांच्या ‘निष्काळजीपणा’मुळे दररोज डझनभर नवजात बालकांना रेफर टू भंडारा पाठवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सद्या बहुतांश नवजात बालकांना सामान्य कावीळ (पिलिया) होत आहे. शारीरिक नवजात कावीळ च्या उपचारासाठी फोटो थेरपी युनिट सुद्धा या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे फोटोथेरपी हा एक प्रकारचा उपचार आहे जो त्वचेच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट ब्लु लाईट प्रकाशाचा वापर करतो आणि नवजात कावीळसाठी सामान्य उपचार आहे. माता नवजात बालक यांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन रूग्ण माता कडे व या नवजात बालकांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही योग्य तापसण्याकरत करीत नाही तर बालकांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय भंडारा किंवा खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे बहुतांश कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात.जे डॉक्टर अश्याप्रकारे सल्ला देतात त्यांचेच खाजगी रुग्णालय येथे असल्याचे बोलले जाते.त्यावरही जे रूग्ण आहेत त्यापैकी अनेक गंभीर रूग्णांना डॉक्टरांचा अभाव, उपकरणांचा अभाव, साहित्याचा तुटवडा दाखवून भंडारा जिल्हा रुग्णालयात रवाना केले जाते. मूल जन्माला घालणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच! स्त्री गरोदर राहिल्यापासून ते प्रसूती होईपर्यंत प्रत्येक बाबतीत स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची असते. तर मुलावरील उपचारासाठी बालरोगतज्ज्ञाची नितांत आवश्यकता असते. मात्र उपजिल्हा रुग्णालय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माताबालकांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे उघड आले आहे.येथील प्रभारी वैद्यकिय अधीक्षक बालरोग तज्ज्ञ आहेत हे मात्र विशेष..या रुग्णालयात सर्व सोई सुविधा उपचार उपलब्ध असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जर बहुतांश नवजात बालकाच्या नातेवाईकाची दिशाभूल करून भंडारा खाजगी रुग्णालयात रेफर करण्यासाठी नातेवाईकांना सल्ला देत असतील तर अशा डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नवजात बालकाच्या कुटुंबीयासह नागरिकांनी केली आहे.

——-@——
जर अश्या प्रकारची परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयात असेल तर उच्च स्तरीय समिती गठीत करून कारवाई करण्यात येईल.

–डॉ.कांचन वानेरे
उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ,नागपूर

Previous articleमहाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे मंगळवारी बदनापुर-भोकरदन दौऱ्यावर  मतदारांशी संवाद साधणार  प्रचार सभांचेही आयोजन
Next articleश्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here