Home पुणे फोनचा कॉल उचलायला गेली आणि पाचव्या मजल्यावरून पडली पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी...

फोनचा कॉल उचलायला गेली आणि पाचव्या मजल्यावरून पडली पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0056.jpg

फोनचा कॉल उचलायला गेली आणि पाचव्या मजल्यावरून पडली पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे (सासवड ):-(प्रतिनिधी विलास पवार )सासवड मधील नामांकित बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची २१ वर्षीय मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिचा दुर्देवी अंत झाला. या घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनुष्का जगताप (वय २१ वर्ष) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जगताप हे सासवड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. २ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती. इमारत पाहात असताना फोन आला म्हणून ती गडबडीत खाली येत असताना पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडली. गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Previous articleसोनई परिसरात तरूणाई मटक्याच्या आहारी? मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोरात
Next articleकाळाचा महिमा —  मित्र,सखा थाॅमस च्या जाण्याने मित्रपरिवार हळहळला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here