Home उतर महाराष्ट्र सोनई परिसरात तरूणाई मटक्याच्या आहारी? मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोरात

सोनई परिसरात तरूणाई मटक्याच्या आहारी? मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोरात

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0083.jpg

सोनई परिसरात तरूणाई मटक्याच्या आहारी? मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोरात

कमलेश शेवाळे ब्युरो चीफ अहमदनगर

मटका व्यवसायाला पुर्णता बंदी घातलेली असली तरी तालुक्यातील सोनई परिसरात अवैध मटका राजरोसपणे चालू आहे. गावांतील मुख्य रस्त्यावर, पोलीस ठाण्याच्या हद्दीत व चौका- चौकात मटका तेजीत असताना पोलिस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असले तरी सामान्य नागरीक मात्र हैराण झाले आहेत.खुलेआम मोक्याच्या ठिकाणी चालणाऱ्या या मटक्यामुळे शाळकरी अनेक मुले या मटक्याच्या आकडेमोडीत गुंतत चालले आहेत. या व्यावसायीकांशी अनेक मध्यस्थी करून या अवैध व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात असून अवैध व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्यांची देखील चौकशीची मागणी जोर धरत आहे.अनेक वेळा सोनई येथे सर्रास मटका सुरू असल्याचे उघड झाले होते.त्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने कारवाईचा केवळ फार्स ठरला असून पुन्हा काही दिवसातच या मटका बुकी यांनी पुन्हा जोर धरला आहे.पोलिसांना सर्वकाही दिसत असून डोळ्यावर पट्टी बांधल्याच्या भुमिकेतून डोळेझाक केली जात आहे.तसेच वरिष्ठ अधिकारी विभागाचा आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस अवैध मटक्याच्या दुकानांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
विविध पक्षांच्या वतीने या अवैध धंद्या बद्दल निवेदन देण्यात आले होते मात्र नेहमी प्रमाणे केराची टोपली दाखवण्यात आली.मटका घेणाऱ्या दुकानांची संख्या वाढली असून शहरात अनेक ठिकाणी मटका सर्रास पणे सुरू आहे मटका घेणाऱ्या मटक्याच्या दुकानांवर छापे टाकतात व तेथील पंटरवर गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया पार करून त्याला सोडून दिले जाते.त्यामुळे मटका चालवणारे आता बिनधास्त पणे खुलेआम हा व्यवसाय करत आहेत. व्यावसायीकाकडून गंगाजळी देत असल्याचे बोलले जाते.जोमाने फोफावलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Previous articleडॉ मणिभाई प्रतिष्ठानाकडून पुण्यात पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड वितरण
Next articleफोनचा कॉल उचलायला गेली आणि पाचव्या मजल्यावरून पडली पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here