Home नांदेड देगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी

देगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_190024.jpg

देगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी
देगलूर.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील चार माजी विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.सहायक सहकार अधिकारी पदावर कडलवार सचिन तर कर सहायक या पदावर भंडरवार श्यामसुंदर, गुडलावार राहुल, निम्मलवार नागेश यांची नुकतीच निवड झाली आहे.या निमित्त महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ हे होते,तर प्रमुख उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे, सत्कारमूर्ती कडलवार सचिन, भंडरवार श्यामसुंदर,निम्मलवार नागेश, गुडलावार राहुल,हे होते.सर्व प्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभव कथनातुन महाविद्यालयाने आपली जडणघडण कशी केली ते सांगुन त्यांनी आपल्या यशाची मुळ प्रेरणा देगलूर महाविद्यालय असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड झालेल्या संतोष खाडे या ऊसतोड कामगाराच्या मुलाचे युट्यूब वरील भाषण ऐकविण्यात आले. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे यांनी समोचीत भाषण झाले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले व महाविद्यालयाचे नाव उंचवावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा.संग्राम पाटील यांनी केले तर आभार प्रा.शिवचरण गुरुडे यांनी केले.या प्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संयोजक डॉ.संजय देबडे, डॉ माधव चोले, डॉ.सुरेश काशिदे डॉ ए. आर डांगे, प्रा.शेरीकर व्यंकट,प्रा .प्रमोद गुजे प्रा. नागरगोजे, प्रा. चिद्रावार प्रा.सौ. तोंडारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक डॉ. एस. एम देबडे , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleजनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन
Next articleशासकीय स्तरावर लेक लाडकी योजनेचा प्रचार व प्रसार करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा- निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here