Home नाशिक जनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन

जनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_185601.jpg

 

  • जनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन

नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १९ डिसेंबर रोजी स्काऊट – गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ह्यामध्ये इ. ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये एकूण ४० ते ४५ स्टॉल लावण्यात आले होते . यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करून अनेक रूचकर विशिष्ट पदार्थ व काहींनी बुध्दीचे खेळ असे स्टॉल लावले होते. आनंद मेळाव्याचे उदिष्ट हे विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाचे स्वरूप कळणे व त्यांची व्यवसायाबाबतची आत्तापासूनच तोंडओळख करून देणे जेणेकरून पुढे जाऊन ते यशस्वीरीत्या काहीही गोष्टी अचूकपणे साध्य करू शकतात. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी शालेय समितीचे रावसाहेब मोरे व काश्मिरे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व स्पर्धकांचे मनोबल वाढवले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Previous articleशेख मोहम्मद रफिक फजल अहेमद यांची जालना असंघटीत कामगार काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
Next articleदेगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here