Home नाशिक निमगांव वाकडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड

निमगांव वाकडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड

164

आशाताई बच्छाव

1000328521.jpg

निमगांव वाकडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे

लासलगाव जवळील निमगांव वाकडा तालुका निफाड येथील ग्रामपंचायतीच्या उपससरपंचपदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती सरपंच पुजा दरेकर यांनी दिली.
गेल्या वर्षी निमगांव वाकडा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक होऊन त्यात लासलगांव बाजार समितीचे माजी उपसभापती ललित (संदीप) दरेकर, दिगंबर दरेकर यांचे नेतृत्वाखालील पॅनलने ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे पहील्या एक वर्षासाठी सौ. अलका गायकर यांना उपसरपंचपदाची संधी देण्यात आली होती. त्यानुसार सौ. गायकर यांनी रोटेशन पध्दतीने मुदत संपल्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यासाठी शुक्रवार (दि. 23) रोजी सकाळी 11.00 वा. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच पुजा दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.
सदर बैठकीत उपसरपंचपदासाठी सत्ताधारी गटाचे सागर सस्कर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.निमगांव वाकडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. बत्तीसे यांनी निवडणुक प्रक्रियेचे कामकाज केले. याप्रसंगी सदस्य ललित दरेकर, विष्णु गायकर, निलेश पुरकर व सदस्या सुरेखा गोधडे यांचेसह इतर सदस्य उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच सागर सस्कर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भगरे सर, श्रीरामजी शेटे, कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, जगदीश होळकर, जयंत दिंडे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleचांदवडजवळ एस.टी.बस ट्रकचा भीषण अपघात पाच जण जागीच ठार
Next articleशिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.