Home भंडारा शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत...

शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप

79
0

आशाताई बच्छाव

1000328534.jpg

शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब

स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप

संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी- पालकांनी आपल्या मुलांना ग्रीष्मकालीन शिबिराकरिता कुठलाही विचार न करता पाठविणे गरजेचे आहे. कारण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब यांनी केले.
त्या श्री दत्ता मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था व्दारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स खात रोड खोकरला येथील उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
ग्रीष्मकालीन शिबिर स्कूल ऑफ स्कॉलर्स चे संचालक रामबिलास सारडा व स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना आंबोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना आंबोलकर, श्री निकेश खेताडे, कु. अंकिता खोब्रागडे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश व सरवस्तीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरादरम्यान स्केटिंग कौशल्य निकेश खेताडे, झुंबा अंकिता खोब्रागडे, कराटे गणेश साकुरे, नृत्य प्रणित उके, हरेश डेकाटे, कोमल उके, संगीत संदीप हांडे, आर्ट अँड क्राफ्ट जयश्री खादाडे, शमिका निनावे, सुंदर हस्तलेखन कौशल्य हेमंत मेश्राम, सौ. दीप्ती बिसेन, सौ. संध्या बोरकर, वाचन व सामान्य ज्ञान सौ. वैशाली बनकर, शितल कोल्हाडे, खेळ सौ. सुषमा सूर्यवंशी, सौ. वंदना मदनकर, बोधकथा सौ. दिपाली सोनकुसरे, अपर्ना सिंगाडे, फायरलेस कुकिंग संपदा खटी, अर्चना सार्वे, शिल्पा बसवारे, उर्मिला पंचभाई, व्यक्तीमत्व विकास वर व्याख्यान डॉ. अशोक पत्की इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिबिरा मागील उद्देश होता. यात अनेक कृती (activity) घेण्यात आल्या. शिबिरात पूर्व प्राथमिक ते वर्ग ९ वर्गातील जवळपास २२६ विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
उन्हाळी शिबिरात घेण्यात आलेला विविध कृतींचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून अधिरा सार्वे, अभीर लांबट, तक्ष कुंभारे, गार्गी चकोले यांना ताज, तसेच उत्कृष्ट उपक्रमात प्राविण्य प्राप्त अर्नव वडेकर, जानकी पाटील यांचा गुणगौरव आणि त्या विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष डेकाटे व प्रास्ताविक वंदना मदनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुषमा सुर्यवंशी यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Previous articleनिमगांव वाकडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड
Next articleमतदान करताना चे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here