Home नांदेड पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याची संतोष पाटील यांची...

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याची संतोष पाटील यांची मागणी.

28
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0005.jpg

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याची संतोष पाटील यांची मागणी.
▪️महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे सहा हजार शेतकरी अनुदानापासून वंचित.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर : महसूल प्रशासन व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. सदरील शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ पोर्टल चालू करून त्यांची केवायसी उपडेट करून त्यांना मागील दोन वर्षाचे अनुदान मिळवून देण्याची मागणी भाजप चे संतोष पाटील यांनी निवेदनाद्वारे येथील सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांना केली आहे.
देगलूर तालुक्यात एकूण 65,589 शेतकरी या योजनेचे लाभार्थी असून मागील दोन वर्षांपासून यामधील जवळपास 6 हजार शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही.
सदरील शेतकऱ्यांना या योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात. परंतु या योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन नोंदणी अद्याप चालू करण्यात आली नाही. तसेच तहसील कार्यालयांमध्ये जवळपास दीड हजार अर्ज पडून आहेत आणि यासाठी दररोज 100 शेतकरी तहसील कार्यालय मध्ये चकरा मारत आहेत.
शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याचे काम अपूर्ण असल्याने तालुक्यातील जवळपास 6 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून हा निधी मिळाला नाही.
येत्या 20 तारखेपर्यंत पीएम किसान योजनेचे काम सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे अन्यथा संबंधित कार्यालयाच्या विरोधात शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा निवेदनामध्ये केला आहे.
सहायक जिल्हाधिकारी यांना भाजपचे संतोष पाटील यांनी सदरील मागणीचे निवेदन दिले ,यावेळी रज्जाक धुंदी,येरगी येथील शेतकरी भूमन्ना पिटलावार, भारत पाटील,विशाल अमृतवार आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here