Home गडचिरोली गडचिरोली शहराला स्वच्छ प्रदूषण विरहित पाणीपुरवठा करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे...

गडचिरोली शहराला स्वच्छ प्रदूषण विरहित पाणीपुरवठा करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मुख्याधिकारी यांना निर्देश

25
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0025.jpg

गडचिरोली शहराला स्वच्छ प्रदूषण विरहित पाणीपुरवठा करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मुख्याधिकारी यांना निर्देश

२-३ दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीवरच्या अपघाती घटनेवरून मुख्याधीकाऱ्यांशी पाणीपुरवठा संदर्भात केली चर्चा

शहरातील पाणी पुरवठा टाकींना संरक्षण भिंतीसह सर्व सुरक्षा सुरक्षात्मक उपाययोजना करीत असल्याची मुख्याधिकारी यांची माहिती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा टाकीमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन मध्ये मृत माणूस आढळल्याने गडचिरोली शहरात खळबळ उडाली असून यापुढे अशी दुर्घटना होऊ नये याकरिता आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्यात व गडचिरोली शहराला स्वच्छ व प्रदूषण विरहित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा असे निर्देश विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिलेत.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे संबंधित अभियंता हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मुख्याधिकारी यांनी गडचिरोली शहरात पिण्याच्या पाण्याच्या ८ टाकी असून ५ टाकींना संरक्षण भिंतीसह सर्व सुरक्षात्मक उपाययोजना आहेत. त्यातील उर्वरित ३ टाकींना संरक्षण भिंती सह सर्व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तातडीने काम सुरू केलेले आहे. या पुढे भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दखल घेतली जात असून पाण्याचा सुरक्षेकरिता टाकीजवळ रात्रपाळी माणूस लावलेले असल्याची माहिती गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिली

Previous articleपशुरोग निदान, लसीकरण शिबिर
Next articleपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याची संतोष पाटील यांची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here