Home बुलढाणा पशुरोग निदान, लसीकरण शिबिर

पशुरोग निदान, लसीकरण शिबिर

41
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0027.jpg

पशुरोग निदान, लसीकरण शिबिर
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना (पळसखेड) व कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील वडशिंगी येथे पशुरोग निदान व लसीकरण शिबिर शनिवारी (दि. ११) पार पडले. शिबिराचे उद्घाटन सरपंच शीतल सुनील वानखडे यांनी केले. यावेळी उपसरपंच दीपाली भगत, शास्त्रज्ञ डॉ. विनोद जानोतकर, डॉ. गवांदे यांची उपस्थिती होती. डॉ. जानोतकर यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. शिबिरात १९८ जनावरांवर औषधोपचार व लसीकरण केले. या शिबिरासाठी पशुसेवक जाधव, राखोंडे, कावडकर, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व गावातील पशुपालकांचे सहकार्य लाभले. शिबिराला गावातील पशुपालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here