Home सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा...

जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

54
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0043.jpg

जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ बिरो महादेव घोलप.

जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून बार्शी मतदार संघातील विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी व समस्यांबाबतची माहिती देऊन त्या दूर करण्याची मागणी मा.पालकमंत्री महोदयांकडे केली.

बार्शी मतदार संघातील बार्शी शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या, अनेक विकास कामांकरिता शासनाच्या विविध योजनांमधून निधीची मागणी करून, त्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरिता आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करून द्यावी. तसेच रस्त्याची जी कामे मंजूर आहेत व ज्या कामांचे कार्यारंभ आदेश ( वर्क ऑर्डर ) देऊनही संबंधित ठेकेदार कामे सुरू करीत नाहीत अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांकरता अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराच्या पुरवठ्या बाबत माहिती देऊन, विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेल्या खेळाबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ठेकेदाराकडून पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्याच्या मापातील कमी प्रमाण याबाबतही माहिती देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री महोदयांकडे केली.

तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यां करीता तालुक्यात नवीन विद्युत रोहीत्र संचची ( ट्रान्सफॉर्मर ) मागणी केली. त्याचप्रमाणे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा करून, नादुरुस्त रोहीत्र संचची तात्काळ उपलब्धता करण्यासाठी वीज वितरण कंपनीला आदेश करण्याची मागणी केली.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आमदारांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळावा व काही विकास कामांना महसूल खात्याच्या मार्फत येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक लावण्याची मागणी केली.

सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleदेश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान – कर्नल एम रंगाराव
Next articleपशुरोग निदान, लसीकरण शिबिर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here