Home अमरावती भारतीय राज्यघटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके

भारतीय राज्यघटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_063434.jpg

भारतीय राज्यघटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला
प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके

चांदूरबाजार : मयुर खापरे 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही जीवनमूल्य दिली त्याचबरोबर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतून मिळवून दिला असे विचार डॉ. राजेंद्र रामटेके यांनी मांडले, ते यावेळी गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. नंदकिशोर गव्हाळे, डॉ. सुभाष शिरसाट, डॉ. रवींद्र डाखोरे, डॉ. जयंत बनसोड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ. प्रवीण परिमल प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून डॉ. प्रवीण परिमल यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका मांडली तर डॉ. सुभाष शिरसाट यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला केवळ संविधान दिले नाही तर भारतीय परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे कार्य केले असल्याचे सांगितले. डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत विदर्भातीलही डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखासारखे अनेक अभ्यासक असल्याचे मत मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लालबा दुमटकर यांनी केले तर आभार डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here