Home अमरावती अवैध गौण खनिज मुरूम उत्खननावर तहसीलदारांची कार्यवाही

अवैध गौण खनिज मुरूम उत्खननावर तहसीलदारांची कार्यवाही

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_062930.jpg

अवैध गौण खनिज मुरूम उत्खननावर तहसीलदारांची कार्यवाही
तीस लाखांचा दंड ठोकला . –                            मयुर खापरे चांदूरबाजार________________________________________
तहसीलदार चांदूरबाजार यांनी नुकतीच अवैध्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी अचलपूर श्रीकांत उंबरकर यांचे मार्गदर्शनात तसेच तहसीलदार गीतांजली गरड यांचे आदेशाने प्रत्येक दिवसाला संपूर्ण तालुक्या करिता एक मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वात सहा तलाठ्यांचे एक पथक निर्माण करण्यात आले आहे त्यावर नियंत्रण म्हणून संबंधित नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता दररोज अवैध उत्खनन व वाहतूक किंवा रेती साठा आढळून आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे एका आठवड्यात दोन वाळूचे साठे जप्त करण्यात आले आहेत
अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसील स्तरावर सातत्याने कार्यवाही करून अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध मिळवला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून जावरा येथील मुरूम उत्खननावर तहसीलदार गीतांजली गरड यांनी एका प्रकरणात 30,09,930 दंड ठोठावला आहे
ब्राह्मणवाडा थळी लगत असलेल्या चिंचोली येथील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मौजा जावरा येथील गट नंबर 89 येथे होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत तलाठी. मंडळ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व कश चौकशी करून सदर मुरूम खदानीची भूविज्ञान व खनिज संचालना नागपूर ( इ टी एस ) मार्फत अचूक मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये संबंधित खदानी लगत *विनापरवाना* केलेले 382.32 ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन आढळून आले. या आधारावर तहसीलदार गीतांजली गरड यांनी संबंधित गट धारकावर 3009930.32 रुपये दंड आकारला.
या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी करणाऱ्यावर चांगलाच वचक बसला आहे

Previous articleजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला
Next articleभारतीय राज्यघटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here