• Home
  • कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ‘कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 जून : ⭕ जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

पंतजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केलं. या औषधाचा वैज्ञानिक अभ्यास, चाचणी करण्यात आल्याचं पतंजलीने सांगितलं. मात्र याबाबत आयुष मंत्रालयाला काहीच माहिती नाही. त्यामुळे याची सविस्तर माहिती आधी आयुष मंत्रालयाला द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवावी असं आयुष मंत्रालयाने (Ayush ministry) म्हटलं आहे.

पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून  280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे.  69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झालेत, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसैर,  म्हणण्यानुसार, ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

कोरोनिल औषध हे सकाळी आणि संध्याकाळी एकदा घ्यावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते, असंही रामदेव यांनी सांगितलं.⭕

anews Banner

Leave A Comment