Home Breaking News *सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक

*सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक

155
0

*सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक*

अलिबाग,जि.रायगड,दि.६:-(युवा मराठा न्युज नेटवर्क)- रायगड जिल्हयातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली हाेती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी हाेणार आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार प्रस्तृत गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) (खुला बाजार विक्री योजना) (देशांतर्गत) मधील ई-लिलावाद्वारे घेतलेला असून निर्यातीवर बंदी असतानाही विविध आफ्रिकन देशात हा तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) या योजनेतील तांदळाचा वापर फक्त देशांतर्गत करण्यासच परवानगी असून या तांदळाच्याही निर्यातीस बंदी आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी हा तांदूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र ही कंपनी अस्तित्वात नसून सादर केलेल्या पावत्याही बनावट, बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. .
कर्नाटक राज्यातील इंडी, विजापूर, जि.विजापूर तसेच हल्लूर, ता.मुदलगी, जि.बेळगाव इत्यादी ठिकाणावरुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ निर्यातीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींच्या कंपन्यांमार्फत दि.१ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत ३२ हजार ८२७ मे.टन तांदूळ परदेशात निर्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे व नवी मुंबई गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांचे ‘विशेष तपास पथक’ नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तेथील रेशन दुकानदारांना अटक केली आहे. गुन्हयाच्या तपासात आजपर्यंत एकूण १८ आरोपी निश्चित करण्यात आले असून त्यापैकी १) नवनाथ लोकू राठोड, वय-२५ वर्षे, रा.ठि.इंडी, विजापूर, कर्नाटक, २) सत्तार चांदसाहब सय्यद, वय-२५ वर्षे, रा.ठि. इंडिया, विजापूर, कर्नाटक, ३) कृष्णा दामो पवार, वय-४५ वर्षे, रा.ठि.जगदंबा मंदिराजवळ, हिरेबेनूर तांडा, ता.इंडी, जिल्हा-विजापूर, कर्नाटक या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाई अंतर्गत टेक केअर लॉजिस्टीक, पळस्पे, येथील पलक रेशन गोडावून, ता.पनवेल, येथून रु.३३ लाख किंमतीच्या रेशनच्या तांदळाच्या प्रत्येकी ५० कि.लो. वजनाच्या २ हजार २२० गोण्या (११० मे.टन) यामध्ये एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळया रंगाच्या व सफेद रंगाच्या २९५ गोण्या त्याचप्रमाणे उर्वरित १ हजार २७३- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेले बारदाना पोती व दोन वजन काटे, 2)झेनिथ इंम्पेक्स कंपनी खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड येथून फूड कॉपोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८०८ गोण्या, 3)जय फूड प्रोडक्शन कंपनी, सावरोली, ता.खालापूर, जि.रायगड. या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८ गोण्या तर 4) जय आनंद फूड कंपनी, मिरांडे इंडस्ट्रीज, भादाणे गाव, पो.पडे, ता.भिवंडी, जि.ठाणे येथून रु.९९ लक्ष १२ हजार ०४६/- रूपये किंमतीच्या तांदळाची ५ हजार ४०४ व गव्हाची ८६० पोती अशी एकूण ६ हजार २६४ पोती जप्त करण्यात आली आहेत.
या गुन्हयाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत पुढील अधिक तपास सुरु आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकाला तपास जलद गतीने पूर्ण करुन गुन्हयात सहभाग असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Previous article🛑 जाणून घ्या कशी आपल्याच जाळ्यात अडकत गेली रिया चक्रवर्ती 🛑
Next article*तरसाळी येथे विकास कामांचे लोकार्पन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सपंन्न*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here