Home Breaking News शेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू.

शेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू.

248
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_210512.jpg

शेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू.

देवळा ( भिला आहेर तालुका प्रतिनिधी)

खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी केली खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात.त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर व मानव आहेर हे आज सकाळची शाळा करून घरी गेले असता. दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वांनराना हुसकवुन लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेलेत.

वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला.त्याला वाचवण्यासाठी मानव यांनी हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला.त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिनेने शेतात पळत येत काकांना हि घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतराणी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले.

मात्र दोघांचाही बुडून मृत्यु झाला. मृत्यू झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय देवळा येथे छवविच्छेदनासाठी आणून छवविच्छेदना नंतर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विध्यालयात इयत्ता सहावीत तर व मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकतात.गणेश आहेर यांच्या दोनही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleॲड विनया नागरे (बन्सोड) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती!
Next articleकाळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाई: जिल्हाधिकारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here