Home Breaking News अहमदाबाद मध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले

अहमदाबाद मध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले

666

अहमदाबाद मध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले

( प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

आज अहमदाबाद गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात आज (दि.१२) कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे. आज गुरुवारी (दि.१२) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले, या घटनेचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसून येत आहेत, तर धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. हे विमान एअर इंडियाचे आहे, अशी माहिती आहे.

Previous articleमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कु. गितांजली मडके ला राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान
Next articleमनसे कडून १ मे रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदाराकडून कारवाई नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.