• Home
  • 🛑 जाणून घ्या कशी आपल्याच जाळ्यात अडकत गेली रिया चक्रवर्ती 🛑

🛑 जाणून घ्या कशी आपल्याच जाळ्यात अडकत गेली रिया चक्रवर्ती 🛑

🛑 जाणून घ्या कशी आपल्याच जाळ्यात अडकत गेली रिया चक्रवर्ती 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 6 सप्टेंबर : ⭕ अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता, ड्रग्जच्या मुद्द्यावरून रियाचा भाऊ एनसीबीच्या जाळ्यात अडकला. एनसीबीकडून रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला शुक्रवारी अटक झाली. या दोघांना कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, एनसीबी टीम मुंबई पोलिसांसह या प्रकरणातील कथित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी पोहचली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला समन्स बजावलं आहे.

एनसीबीची टीम आजच रिया चक्रवर्तीची याप्रकरणी चौकशी करणार असून रिया चौकशीसाठी सकाळी साडेदहा वाजता स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे. तर यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावताना रियाच्या पुढे दोन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये रियाला चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन करताना तिने स्वतःहून चौकशीसाठी यावं किंवा तीनं आत्ता आमच्या टीमसोबत चौकशीसाठी स्वतः यावं. यावेळी रियाला समन्स देण्यात आला तेव्हा ती स्वतः घरी हजर होती.

सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर राहिलेला सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या दोघांनाही किल्ला कोर्टानं ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ड्रग्ज पेडलर कैजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे रियालाही NCB ने समन्स बजावलं असून, आज तिचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.⭕ रिया चक्रवर्तीचे वकील म्हणाले- ती अटकेसाठी तयार, जामिनासाठीही करणार नाही प्रयत्न

anews Banner

Leave A Comment