Home नांदेड मदनुर, देगलुर, मरखेल पोलीसांची सयुंक्त धाडसी कामगिरीआंतरराज्य जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद

मदनुर, देगलुर, मरखेल पोलीसांची सयुंक्त धाडसी कामगिरीआंतरराज्य जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0012.jpg

मदनुर, देगलुर, मरखेल पोलीसांची सयुंक्त धाडसी कामगिरी▪️आंतरराज्य जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 27.09.2022 रोजी 2 वाजताच्या सुमारास पो.स्टे मदनुर तेलंगाना येथील पोउपनि शिवकुमार यांनी पो.नि सोहन माछरे पो.स्टे देगलुर यांना फोन वरुन बिचकुंदा व जुक्कल हद्दीतुन जनावरे चोरुन टाटा टेम्पो 407 या वाहनातुन घेवुन जात आहेत सदर वाहनास आडवित असताना त्यातील चोरट्या इसमांनी मदनुर पोलीसांच्या वाहनावर दगडफेक करुन जिवे घेणा हल्ला केला असुन सदर वाहन हे देगलुर शहराच्या दिशेने येत आहे बिचकुंदा व मदनुर येथील पोलीस त्याचा पाठलाग करीत येत आहेत पो.स्टे हद्दीत नाकाबंदी करून सदर वाहनास थांबविणे बाबत सांगीतले . सदर माहीती मिळाल्या वरुन पो.नि माछरे यांनी रात्रगस्त कामी असलेले अधिकारी पो.उप.नि श्रीकांत मोरे, व पोलीस अमलदार पोहेकॉ / 2462 ज्ञानोबा केंद्रे, पोहेकॉ / 2417 वचन करले, चालक पोना / 461 शेख जावेद, पोकॉ / 1788 सुधाकर मलदोडे, चालक पोकों / 2895 सुर्यकांत महाजन, पोकों / 3118 क्षितीज भोसले यांना माहीती दिल्याने त्यांनी देगलुर शहरात नाकाबंदी करुन नमुद ‘वर्णनाचे वाहनास मदनुरनाका येथे थांबविण्याचा प्रयत्न केला असताना वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबविता उदगीररोड ने भरधाव वेगात पळून गेले सदर वाहनाचा पोउपनि मोरे व त्यांचे सोबत चे अमंलदार व तेलंगाना पोलीस यांनी पाठलाग करुन वाहन थांविण्याचा प्रयत्न केला असताना कारेगांव येथे जनावर चोरट्यांनी गतिरोधकावर वाहन थांबविण्याचा बाहाना करुन चोरट्यांनी त्यांचा टेम्पो रिव्र्व्हस घेवुन तेलंगाना पोलीसांच्या वाहनास धडक देवून मरखेलच्या दिशेने पळ काढला त्या मुळे पो.नि माछरे यांनी पो.नि विष्णुकांत गुट्टे, सपोनि नामदेव मद्दे पो.स्टे मरखेल यांना माहीती दिल्याने सपोनि मद्दे व सोबत पो. कॉ.3207 चंद्रकांत पांढरे, पो. कॉ. 258 ग्यानोबा केंद्रे यांनी मरखेल बसस्थानका जवळ नाकाबंदी करुन वाहन थांबविणयाचा प्रयत्न केला परंतु नाकाबंदी तोडुन वाहन हाणेगांवच्या दिशेने गेल्याने पो. नि. विष्णुकांत गुट्टे व चालक पोहेकॉ 2448 मंगनाळे यांनी हाणेगांव येथे स्थानिकांच्या मदतीने मोठे वाहन ट्रेलर रोडवर आडवे लावुन नाकाबंदी केली. सदर चोरटे समोर थांबविलेले वाहन पाहुन त्यांचे टेम्पो बळवून घेत असताना पो.स्टे मरखेल येथील पोलीस जिपला धडकुन चोरट्यांचा टेम्पो रोडच्या खाली गेला त्या वेळी टेम्पोच्या पाठलागावर असलेल्या पोलीसांनी टेम्पोतील इसमांना ताब्यात घेत असताना आंधाराचा फायदा घेवुन काही पाच चोरटे पळुन गेले व त्यातील एक चोरटा नामे आरशद सुभानखान वय 32 वर्षे रा. गाचरका जि. मेवात हरीयाना यास ताब्यात घेवुन 407 टेम्पो, टेम्पोत असलेल्या जनावरासह मुद्देमाल पोस्टे मदनुर तेलंगांना येथील एस.आय शिवकुमार यांच्या ताब्यात दिले. सदर घेटने बाबत पो.स्टे मदनुर तेलंगाना येथे मदनुर पोलीसांवर जिवघेणा हल्ला केल्या बाबत तसेच जनावरे चोरी बाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जनावर चोरट्यांचा पाठलाग करुन आरोपी व वाहन चोरल्या जनावरासह पकडुन देण्यास मदत केल्याने मा. बी. श्रीनिवास रेड्डी पोलीस अधिक्षक कामारेड्डी राज्य तेलंगाना व मा. प्रमोदकुमार शेवाळे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कामगीरी बद्दल पोलीस अधिकारी अमंलदार यांचे विशेष कौतुक केले आहे.

Previous articleवानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.
Next articleघटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या नाही!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here