Home विदर्भ सहकार विद्या मंदिरच्या बसने तरुणाला चिरडले, जागीच ठार, बुलडाणा शहरातील दुर्दैवी घटना,...

सहकार विद्या मंदिरच्या बसने तरुणाला चिरडले, जागीच ठार, बुलडाणा शहरातील दुर्दैवी घटना, तीन मुलींचे पितृछत्र हरवले

83
0

राजेंद्र पाटील राऊत

सहकार विद्या मंदिरच्या बसने तरुणाला चिरडले, जागीच ठार, बुलडाणा शहरातील दुर्दैवी घटना, तीन मुलींचे पितृछत्र हरवले बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) ः विद्यार्थ्यांना घरी सोडून परतणाऱ्या सहकार विद्या मंदिरच्या बसने पादचारी तरुणाला चिरडले. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाला. बुलडाणा शहरातील वावरे ले आऊट भागात आज, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

मोहन जगन अवसरमोल (३०, रा. केसापूर, ता. बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सहकार विद्या मंदिरची बस (क्र. एमएच २८ बी ७२०३) वावरे ले आऊट भागातून विद्यार्थ्यांना घरी सोडून परतत होती. त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या मोहनला बसने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous articleलडकी हूँ लड सकती हूँ
Next articleगाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here