Home पुणे लडकी हूँ लड सकती हूँ

लडकी हूँ लड सकती हूँ

119
0

राजेंद्र पाटील राऊत

लडकी हूँ लड सकती हूँ                                                    भोर,(महेश भेलके तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

अखिल भारतीय काँग्रेस पक्ष्याच्या महासचिव श्रीमती प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली लडकी हूँ लड सकती हूँ हे अभियान पुण्यातील गुडलक चौक याठिकाणी सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पार पडले पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील महिलांना प्रेरणा मिळेल ,महिला सबलीकरण सशक्तीकरण होणे ही आगामी काळाची गरज आहे ,महिलांनी इतिहास घडविला आहे यापुढील काळात महिलांना ऊर्जा मिळावी अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळावी या उद्देशाने ही मोहीम आदरणीय नेत्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव आदरणीय प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे असे मत आमदार संग्रामदादा थोपटे यांनी मांडले या मोहिमेला 21 फेब्रुवारी रोजी 125 दिवस पूर्ण झाले त्याबद्दल पुणे जिल्हा व शहर महिला काँग्रेस च्या वतीने हे अभियान पुण्यात राबवण्यात आले असेही यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे बोलले ,या कार्यक्रमा प्रसंगी विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर उपस्थित होत्या या पार्श्वभूमीवर त्यांनी देखील महिलांना संबोधीत केले तसेच येत्या 8 मार्च महिला दिनानिमित्त राज्य सरकारचे नवीन महिला धोरण अमलात आणणार असल्याचे देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे ,महिला शहाराध्यक्षा पूजा आनंद ,शहाराध्यक्ष रमेश बागवे ,माजी आमदार दीप्ती चवधरी ,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे,इंदिरा अहिरे,आदी महिला उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here