Home बुलढाणा जाती जमातीच्या लोकांना आर्थिक, सामजिक, क्षेत्रात न्याय दया ऑल इंडिया पँथर सेनेची...

जाती जमातीच्या लोकांना आर्थिक, सामजिक, क्षेत्रात न्याय दया ऑल इंडिया पँथर सेनेची रॅली काढून तहसील कार्यालयावर धडक

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0038.jpg

भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घ्या तसेच अनुसुचित जाती जमातीच्या लोकांना आर्थिक, सामजिक, क्षेत्रात न्याय दया

ऑल इंडिया पँथर सेनेची रॅली काढून तहसील कार्यालयावर धडक
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी:-रवि शिरस्कार,संग्रामपुर

भिमाकोरेगाव येथे धार्मिक उन्मादी यमनुवाद्यांकडून सुनियोजितपणे दंगल घडविली गेली भीम अनुयायांना मारहाण करण्यात आली, परिसरात जाळपोळ करण्यात आली, गाड्या फोडण्यात आल्या. यानंतर महाराष्ट्राभर या दंगलींच्या निषेधार्थ, दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भीम सैनिकांमार्फत आंदोलने करण्यात आली. परंतु तत्कालीन सरकारने दंगल घडवणाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर सर्रासपणे गुन्हे नोंदविले होते. या भीमसैनिकांमध्ये अनेक विद्यार्थी, महिला, वृद्ध यांचा समावेश होता, आज या घटनेला ३ वर्ष उलटून गेले तरीही सरकारकडून भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. तदनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवरील गुन्हे, व कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे स्वतंत्र पद्धतीचे जीआर काढत रद्द केलेले आहेत. भीमसैनिकांवरील गुन्हे रद्द करण्याकरिता अद्यावत कुठल्याच संदर्भात कोणताच स्वतंत्र जीआर काढण्यात आलेला नाही, या प्रकारामुळे सरकारची पक्षपाती भूमिका समोर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गंभीर विषयांसंदर्भात व अनुसूचित जाती जमातीच्या आर्थिक, सामाजिक व इतर प्रश्नांबाबत ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. तसेच या समाजातील अनेक घटना विरोधात अनेक निवेदने देऊन सुद्धा त्यावर कोणती कारवाई झालेली नाही अश्या अनेक इतर मागण्यांसह आज ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे

यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेना तालुका अध्यक्ष विजुभाऊ वानखडे यांच्यासह आनंद हेरोळे, विकास खंडेराव, राजेंद्र लहासे, कुणाल तायडे, आकाश शेगोकार, श्रावण सोनवणे, रवी उमाळे, सिद्धार्थ तायडे, रविराज गवांदे, अंकुश बोदळे, आकाश शिरसाट, धम्मदीप गवांदे, सिद्धार्थ तायडे,
व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्रातील सर्वात मोठे कोवीड सेंटर बंद होणार!
Next articleसतत दार अतिवृष्टी सोबतच शेतातील वाणी कीटक तसेच हरणांचे कळपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here