Home बुलढाणा सतत दार अतिवृष्टी सोबतच शेतातील वाणी कीटक तसेच हरणांचे कळपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात...

सतत दार अतिवृष्टी सोबतच शेतातील वाणी कीटक तसेच हरणांचे कळपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

96
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0039.jpg

सतत दार अतिवृष्टी सोबतच शेतातील वाणी कीटक तसेच हरणांचे कळपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल
प्रतिनिधी:-रवि शिरस्कार,संग्रामपूर

बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचे झालेले नुकसानी मुले तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांनी आज २९जुलै रोजी तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले आहे.
निविदांमध्ये नमूद आहे की या तालुक्यांमधील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीसह शेतीतील वाणी कीड, तसेच हरणांचे कळप यापासून खूप मोठे नुकसान झालेले आहे जवळपास ७०%शेती उलटलेली आहे व शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली, झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्यामध्ये खूप पीके बुडालेली आहे.
या सर्व कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्जबाजारी होऊन निराश झालेला आहे तरीही शासनाने संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतींचे सर्व्हे करून पंचनामे करावे व प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित असलेले युवा शेतकरी राहुल शिरसोले, गणेश वानखडे, तुषार सातव,अफसर कुरेशी, राजनकार सर, पांडुरंग इंगळे,
प्रशांत गोसावी, शरद राजणकर, आनंद राजणकर, अभिजीत शिरसोले यांच्या सह संग्रामपूर येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here